तालुकास्तरीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावा संपन्न*
शहर प्रतिनिधी बार्शीटाकळी
ग्रंथ आपल्या आयुष्याला दिशा देण्याचे काम करते असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी संदीप मालवे यांनी केले ते तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी कार्यक्रमांमध्ये बोलत होते
शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शीटाकळी अंतर्गत आज जिल्हा परिषद उर्दू प्रा शाळा बार्शीटाकळी येथे महावाचन उत्सवानिमित्त तालुकास्तरीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावा चे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्येक्ष पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संदीप मालवे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून मा शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोद जानोरकर गट समन्वयक दिलीप आवटे महान केंद्रप्रमुख शाहिद इकबाल खान सरफराज खान मुख्याध्यापक जरांगेज बानो मुख्याध्यापक काझी रिजवानोद्दीन हे होते या वेळी तालुक्यातील उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी तालुक्यातील गीतांजली विद्यालय बाबासाहेब धाबेकर विद्यालय महान उर्दू जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा सावित्रीबाई फुले विद्यालय च्या वतीने ग्रंथ प्रदर्शनीचे स्टॉल लावण्यात आले होते याचे लाभ तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतले या वेळी साधन व्यक्ती गणेश राठोड किशोर जाधव राजेश सातपुते नागपुरे मॅडम शरद राठोड दिपक ठाकरे सुषमा डोरले वृशाली सोनार चंदन जाधव राजेन्द्र खलोकार कुलदीप बोदडे निलेश बनसोड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला बनाईत यांनी तसेच आभार प्रदर्शन निलेश बनसोड यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती