Khozmaster
1 Min Read
अतिवृष्टी भागांची पाहणी..!
आपल्या मेहकर तालुक्यातील मागील दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे देऊळगाव साकर्शा भागातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रामुख्याने जमिनीतील पिके अजूनही पाण्याखाली आहेत. तसेच नदीसह लहान मोठे ओढे तुडुंब भरून वाहात आहेत. परिणामी, बळीराजा अतिशय चिंतेत आहे. त्यामुळे आज मौजे पारखेड, देऊळगाव साकर्शा, मांडवा डोंगर,मोहना, मांडवा फॉरेस्ट,वडाळी,पाथर्डी येथे मी स्वतः संबंधित प्रशासकीय अधिकारी सोबत घेवून या विविध गावांचा दौरा करून नुकसानीची पाहाणी केली.
तसेच नुकसानग्रस्त जमिनींचे पंचनामे तात्काळ करण्याची सूचना महसूल विभागास केल्या आहेत.
यावेळी
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.श्री. माधवराव जाधव, यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, विविध गावचे सरपंच, शेतकरी, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *