मराठा योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी मंठा तालुक्यातील लिंबेवडगाव येथे भेट देवून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत आपग्रस्तांना दिलासा दिला.
तालुक्यातील लिंबेवडगाव परतुर मंठा तालुक्यात येथे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने गावातील नागरिकांच्या घरांचे, शेत आखाडे उद्ध्वस्त होवून शेतातील शेतीचे साहित्य, खते, जनावरे पावसात वाहून गेले असून गावाला पावसाच्या पाण्याने वेढा बसल्याने नागरिक भयभीत झाले होते. घटनेची माहिती मिळताच मराठा योध्दा मनोज दादा जरांगे पाटील व सहकारी
यांनी गावकरी यांची भेट घेवून आपत्तीची पाहणी करून गावकऱ्यांची विचारपूस केली. तसेच तालुक्यातील टोकावाडी आदी भागातील शेतकऱ्यांना सोबत चर्चा केली. अतिवृष्टीमुळे शेतातील
पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात पाहणी करून नागरिकांना व शेतकरी यांना धीर देऊन शासनाकडे तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी, जनावरे, घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. तेव्हा पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागण मराठा योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी प्रशासनाकडे केली.