बाईsss! अग्निशमन दलाचे कर्मचारी दिसायचे ‘हॉट’, तिने दोनवेळा शेताला मुद्दाम लावली आग

Khozmaster
1 Min Read

ग्रीसमध्ये एका महिलेला दोनदा शेताला आग लावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. महिलेने शेताला आग का लावली याचं कारण समजल्यावर नक्कीच धक्का बसेल. महिलेला अग्निशमन दलाचे कर्मचारी खूप चांगले, हँडसम आणि हॉट वाटायचे.

तिला त्यांच्यासोबत काम करायला आणि फ्लर्ट करायला भरपूर आवडायचं. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने दोनदा शेताला आग लावली आहे.

त्रिपोली पोलिसांनी महिलेच्या अटकेबाबत माहिती दिली आहे. अर्काडियातील त्रिपोली नगरपालिकेच्या केरासिट्सा परिसरात दोनदा जाणीवपूर्वक शेतजमिनीला आग लावण्यास ही महिला जबाबदार आहे असं म्हटलं आहे. महिलेने असं केलं कारण तिला अग्निशमन दलाचे कर्मचारी पाहण्यात आणि त्यांच्यासोबत फ्लर्टिंग करण्यात मजा येत होती.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीच्या दोन्ही ठिकाणी ही महिला दिसली, ज्यामुळे लोकांमध्ये संशय निर्माण झाला. अखेर अधिक तपास केल्यानंतर सत्य समोर आलं. असा प्रकार कोण करणार या विचाराने पोलीसही हैराण झाले होते.

डेलीमेलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आणि लिहिलं, ग्रीसमधील एका ४४ वर्षीय महिलेने दोनदा शेतीला आग लावली कारण तिला अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना पाहणं आणि त्यांच्यासोबत फ्लर्ट करणं आवडायचं. महिलेला आता तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा मिळाली आहे. या घटनेची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

0 9 3 8 5 7
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *