गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
जालना येथील जिल्हा परिषद प्रशाला मुलांची मल्टीपर्पज हायस्कूल जालना या ठिकाणी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असलेल्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका डॉ शिवनंदा मेहेत्रे यांना सन २०२३-२४ चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पती श्री हरकळ साहेब सेवानिवृत्ती आरोग्य कर्मचारी यांच्यासमवेत शाल, पुष्पगुच्छ व प्रसिद्ध ग्रामीण कवी श्रीकांत गायकवाड यांचा रानफुले हा काव्यसंग्रह देऊन सहदय सत्कार करण्यात आला.शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून राज्यातील 110 शिक्षकांपैकी जालना जिल्ह्यातील दोन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे .त्यापैकी डॉ शिवनंदा मेहेत्रे या एक शिक्षिका होत.त्यांनी शंभर शिक्षक क्लब ,अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला यांच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक , साहित्यीक व सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी केलेली आहे. त्या उत्तम प्रकारच्या लेखिका सुद्धा आहेत.याच बाबींची विशेष उल्लेखनीय कामगिरी पाहूनच शासनाने त्यांना आदर्श माध्यमिक शिक्षिका म्हणून पुरस्कार जाहीर केलेला आहे.येत्या ५ सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिनी शासनाच्या वतीने मुंबई या ठिकाणी त्यांचा विशेष गौरव केला जाणार आहे.त्यांचा सत्कार करण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय कार्यकारणी उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवटटे, जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे, जिल्हा सचिव संजय येळवते,मार्गदर्शक तथा बामुक्टो संघटनेचे सरचिटणीस तथा जून्या पेन्शन संघटना राज्याध्याक्ष , प्रसिद्धअर्थतज्ञ डॉ मारूती तेगमपुरे,केंद्रीय कार्यकारणी सदस्य आरेफ कुरेशी,कोषाध्यक्ष नारायण मुंडे, कार्याध्यक्ष एफ ए सय्यद,उपाध्यक्ष जगन वाघमोडे, सहसचिव प्रद्युम्न काकड,महिला आघाडीच्या शहराध्यक्ष ज्योती पांगारकर, श्रीमती मगर प्रबोधनकार ठाकरे महाविद्यालय शहागड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते