जालना ;-
मंठा–जालना महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. या महामार्गावर वारंवार होणाऱ्या गंभीर अपघातांत आतापर्यंत अनेकांचे प्राण गेले आहेत. त्यात भर घालत बुधवारी रात्री सुमारे ११ वाजता आकणी पाटी येथे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू, तर पाचजण गंभीर जखमी झाले.
एमएच 23 AD 7081 या क्रमांकाची स्कॉर्पिओ मंठा येथून जालन्याकडे जात असताना उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक बसली आणि अत्यंत भयानक स्वरूपाचा हा अपघात घडला.
ठार झालेले
सुरेंद्र सिंह (छत्तीसगड)
सुशांत केवट (छत्तीसगड)
दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
जखमी
राजा शाहू
सनी चव्हाण
विशाल साबू
राजा यादव
अशोक चोले
हे सर्व नागपूरहून केजकडे उसतोडीसाठी जात असताना हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातानंतर वाटूर येथील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदतकार्य सुरू केले. त्यानंतर १०८ अॅम्ब्युलन्सचे डॉ. संतोष जाधव आणि बाबा शेख यांनी जखमींना तातडीने जालना येथे उपचारासाठी हलवले.
अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड, एपीआय विठ्ठल केंद्रे, संतोष माळगे आणि जगन्नाथ सुक्रे करत आहेत.
मंठा–जालना महामार्गावर अपघातांची मालिका कायम — स्कॉर्पिओची उसाच्या ट्रॅक्टरला भीषण धडक; दोन ठार, पाच जखमी
0
8
9
4
5
2
Users Today : 18
Leave a comment