(नेवासा प्रतिनिधी :- लखन वाल्हेकर)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या तालुका अध्यक्षपदी जुनेद शेख यांची निवड.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेवासा तालुका अध्यक्ष पदी युवा नेते आणि खासदार निलेशजी लंके यांचे विश्वासू सहकारी जुनेद शेख यांची निवड खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पत्र देऊन करण्यात आली.
नेवासा तालुक्यात मोठा जनसंपर्क आणि मित्रपरिवार असल्यामुळे पक्षाचे तालुका अध्यक्ष सतीश थोरात आणि सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे यांनी जुनेद शेख यांच्या नावाची शिफारस पक्षाकडे केली होती.
आज माका येथे राष्ट्रवादी पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमात जुनेद शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली.
त्यांच्या या निवडीचे नेवासा तालुक्यातील मित्र परिवाराने अभिनंदन केले.
चौकट: आदरणीय खासदार निलेशजी लंके साहेब, सतीश थोरात अभिजित ससाणे यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो सार्थ ठरवून अल्पसंख्याक सामाज्याची मोठी ताकद पक्षाच्या मागे उभी करण्यासाठी मेहनत करणार असे प्रतिपादन नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष जुनेद शेख यांनी केले.