*आम्हीच निवडतो आमचे आदर्श शिक्षक,गुप्त मतदानाने होते शिक्षकांची निवड,टेंभुर्णी तील सेठ एकनाथ भगवानदास काबरा विद्यालयातील उपक्रम*
जाफराबाद.दि.६.(विजय खरात) एरवी शिक्षक दिनाला अनेक ठिकाणी शिक्षकांना प्रशासनाकडून आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यासाठी शिक्षकांना स्वतः आपल्या कार्याची फाईल दाखल करावी लागते आणि शासन प्रशासनाकडे हेलपाटे मारावे लागतात. मात्र,जाफराबाद तालुक्यात एकनाथ भगवानदास काबरा एक अशी शाळा आहे,जेथे शाळेतील शिक्षकांना प्रशासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराची वाट पाहावी लागत नाही. या शाळेत दरवर्षी शिक्षक दिनी शाळेतील विद्यार्थी चं आपले आदर्श शिक्षक निवडतात,तेही गुप्त मतदानाने.
एरवी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळण्यासाठी अनेक गुरुजी जीवाचा आटापीटा करत असतात. एकदा पुरस्कार मिळाला की,आपण आदर्श झालो,असा त्यांचा समज असतो. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवण्यासाठी बरीच मोठी वेटिंग असते. आता हे पुरस्कार कोणाला द्यायचे,हे वरिष्ठ अधिकारी ठरवतात. ते आदर्श कोणाचं असतात हे बहुधा न समजण्या पलिकडे च कोढ होऊन बसलेलं आहे.
मात्र विद्यार्थ्यांच्या मनात असणारा चांगला शिक्षक म्हणजे आदर्श शिक्षक ठरू शकतो. यामुळेच येथील सेठ ईबीके उर्दू विद्यालयात विद्यार्थीच आदर्श शिक्षकाची निवड करतात. टेंभुर्णी येथील ईबीके उर्दू विद्यालयात दरवर्षी हा आगळावेगळा आदर्श पुरस्कार शिक्षकांना दिला जातो. यावर्षी प्राथमिक विभागातून शेख गयास यांची,तर माध्यमिक विभागातून शेख साबेर यांची विद्यार्थ्यांनी या पुरस्कारासाठी निवड केली. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः आणलेल्या ट्रॉफी देऊन या दोन्ही शिक्षकांचा शाळेत गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांकडून मिळालेला पुरस्कार हा आमच्यासाठी सर्वोच्च गौरव असल्याचे मत आदर्श शिक्षक साबेर यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान,शिक्षक दिनाच्या एक दिवस अगोदर शाळेतील सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात ठेवलेल्या बॉक्समध्ये गुप्त पद्धतीनें मतदान रूपी आपल्या बेस्ट गुरूच्या/टीचर च्या नावाची चिठ्ठी टाकतात,यामुळे कोणत्या विद्यार्थ्याने कोणत्या शिक्षकांची निवड केली हे समजत नाही. त्यांचे कारण म्हणजे शिक्षक दिना पर्यंत हे नाव विद्यार्थ्यांकडून गोपनीय ठेवले जाते.