छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे दिनांक: ५ सप्टेंबर २०२४ रोजी भगवान सर्वज्ञ श्री भगवान चक्रधर स्वामी अवतार दिवस हा महानुभाव पंथ आणि उपदेशी परिवार समाजातर्फे आज रात्री ०९ वाजता,देवाचा मुगुट ठेवून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढून मोठया उत्साहात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिवस साजरा करण्यात आला.सकाळपासून चक्रधर मंदीरावर विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन पुजारी मंडळी यांच्या वतीने करण्यात आले होते.भजन स्पर्धा, संगीत खुर्ची, प्रवचन असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते.सकाळी ७:३० वाजता पंच अवताराच्या जयघोषात प्रभात फेरी निघाली,लहान लहान चिमुकल्यांनी, पंच अवताराच्या वेशभूषा केल्या.सकाळी ९:०० वाजता ध्वजारोहन झाले,प.पू.प.म.श्री.आंबेकर बाबांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तद्नंतर लगेचच धर्मसभा भरली,धर्म सभेच्या अध्यक्ष पदी,प.पू.प.म.श्री.भीष्माचार्य बाबाजी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.जाळीचा देव येथील तरुण पुजारी बंटी पुजारी यांनी धर्मसभेचे सूत्र संचालन केले.धर्म सभा संपल्या नंतर जाळीच्या बाबांना मंगल स्नान झाले,१२:०० वाजता महाआरती झाली,आरती झाल्यावर सर्व भक्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती,सायंकाळी चार वाजता,बंटी पुजारी मयुर पुजारी निलेश पुजारी सागर वाईंदेशकर निशिकांत चोरमारे यांनी,लहान मुलांचे खेळ घेतले,नंतर दहीहंडी उत्सव होता,दहीहंडी ला आमदार संतोष भाऊ दानवे हे उपस्थित होते,भाऊंनी 5001 रुपयाचे बक्षीस दिले,नंतर दहीहंडी फुटली,रात्री ७:०० वाजता आरती झाली,आरती संपताच बुलढाणा येथील धर्मवीर आमदार संजू भाऊ गायकवाड यांचे आगमन झाले,त्यांनी देवाला विडा अर्पण केला,पालखीचे पूजन त्यांच्या हस्ते झाले,नंतर पालखी मिरवणूक सुरू झाली,पालखी समोर मयुर पुजारी निलेश पुजारी बंटी पुजारी यांनी मुलांची लेझिम बसून दिली होती ती पालखी समोर सादर केली,याप्रसंगी
जाळीचा देव परिसरातील महानुभाव पंथ आणि उपदेशी परिवारच्या लहान बाळगोपाळासह पुरुष व महिलांनी देखील वाजांत्रीच्या तालावर ठेका घेत मिरवणुकीचा आनंद घेतला.सदर भगवान श्रीचक्रधर स्वामीची पालखीची मिरवणुक शांततेच्या वातावरणात पार पडली, या कामी भोकरदन पोलीस स्टेशनचे सपोनि यांनी आपले सहकारी पोलीस कर्मचारी बंदोबस्ता साठी जाळीचा देव पाठविले होते.यावेळी सरपंच सुदाम पुजारी, किशोर उदरभरे,सचीन पुजारी, रमेश मानेकर, मधुकर पुजारी,सचीन पुजारी, निलेश उदरभरे,गोकुळ पुजारी,बंटी किशोर पुजारी रवींद्र पुजारी,मयुर पुजारी सुरेश पुजारी वसंत पुजारी प्रकाश पुजारी जीवन पुजारी आदर्श पुजारी राजू पुजारी अनिल पुजारी स्वप्नील आंबेकर संत महंत, वासनिक, भाविक भक्त, बालगोपाल, महिला, चक्रधर मंदिर संस्थानचे सर्व पुजारी मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.