छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जय कालंका देवी शिक्षण संस्था संचलित शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावळदबारा येथे महाराष्ट्र शासन पुरस्कृत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद छत्रपती संभाजी नगर अंतर्गत सोयगाव तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडली याप्रसंगी सोयगाव तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळा स्पर्धेत सहभागी होत्या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते व माजी सरपंच मुकुंदा आनंद मानकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले याप्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती साखरे गीता यांच्या मार्गदर्शनानुसार स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या याप्रसंगी तालुक्यातील वयोगट 14 ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांना त्यांच्या वजन गटानुसार त्यांच्या कुस्त्या लावण्यात आला यामध्ये 17 ते 19 वयोगटातील महिला पैलवानांना बाय मिळाला तर विजयी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या व आयोजकाच्या वतीने सत्कार करण्यात आला विजयी विद्यार्थी मल्ल खालील प्रमाणे वयोगट 14 दुर्गेश विनोद मोरे इंग्लिश स्कूल बनोटी ओम युवराज जाधव माणिकराव पालोदकर विद्यालय फरदापुर बाळासाहेब समाधान सूर्यवंशी सरस्वती भवन विद्यालय गोंदेगाव साई धनराज जाधव मापा विद्यालय फरदापुर, वयोगट 17 मंगेश संतोष शेळके यशवंतराव विद्यालय किन्ही सचिन आनंदा सोनवणे व संग्राम अनिल देशमुख स भू गोंदेगाव
अंकुश संतोष राठोड शिवाजी विद्यालय सावळदबारा प्रेम मनोहर पवार ना धो महानोर वडगाव तिगजी 19 वयोगटातील विजयी
सोहेल रोप शेख स भू गोंदेगाव वसीम शेख कलीम विद्यालय जे एस एस बनोटी जगदीश लक्ष्मण पगड वाले राजकुवर महाविद्यालय बनोटी गायत्री किसन बावणे शिवाजी विद्यालय सावळद बारा, कांचन चंद्रकांत कोळी संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव एवढे विद्यार्थी विजयी झाले असून त्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे त्यानिमित्ताने संस्थेच्या व शाळेच्या वतीने विजयी स्पर्धकांचे व त्यांच्या शाळेचे व पालकांचे जाहीर सत्कार करण्यात आला यासाठी पंच व आयोजक म्हणून डॉ.जयराम घोती, क्रीडाशिक्षक विजय सिंग राजपूत सुदाम राठोड व भास्कर खमाठ अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली याप्रसंगी गावातील व परिसरातील अनेक मान्यवर व पालक विद्यार्थी उपस्थित होते केंद्रप्रमुख जनार्दन साबळे, केंद्रीय मुख्याध्यापक विठ्ठल राठोड, ग्रामपंचायत सदस्य संजय चव्हाण विनोद टिकारे रामचंद्र चिमणकर पंढरी साबळे माजी सरपंच किसन सूर्यवंशी ज्येष्ठ पत्रकार गोकुळ सिंग राजपूत रहीम पठाण बहादुर सिंग चव्हाण सुनील चोरमले पोलीस कर्मचारी मीरखा तडवी, गोपाळ साहेब , रवी कोळपे यांची उपस्थिती होती याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतिशय उत्कृष्ट स्पर्धा नियोजन केल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष भाऊराव लक्ष्मणराव कोलते यांनी सर्वांचे अभिनंदन केले व अशाच शालेय स्पर्धा आपल्या शाळेचे मध्ये आयोजित करून मुलांच्या सर्वांगीण व सर्वकष विकास करावा जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच आपल्या अंगातील कला व गुण दाखवण्याची संधी प्राप्त होऊ शकते जेणेकरून या संधीचे भविष्यात ते सोने करू शकता असे सर्वांना मार्गदर्शन केले व पुनश्च सर्वांना शुभेच्छा दिल्या सदरील स्पर्धेसाठी यशस्वी कामगिरी करणाऱ्या मुख्याध्यापक नारायण कोलते व त्यांच्या सर्व शिक्षकांचा स्पर्धेसाठी आलेल्या सर्व शिक्षकांनी व पालकांनी विशेष आभार मानले अशी माहिती अजबराव चव्हाण व श्याम जाधव यांनी दिली.