वरखेडी तांडा येथे पालकमंत्री यांनी केले विविध विकास कामांचे भूमिपूजन; जि.प.सदस्य गोपीचंद जाधव याची माहिती

Khozmaster
1 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 
सोयगांवः तालुक्यातील वरखेडी तांडा  येथे दि.५/९/२४ रोजी विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाला.अशी जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव यांनी सांगितले यावेळी जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव व गावकऱ्यांच्या वतीने पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ना. अब्दुल सत्तार यांनी येथील महिला भगिनींशी संवाद साधत त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री, श्रावण बाळ, तीर्थयात्रा इत्यादी योजनांची माहिती देऊन याचा लाभ घेण्याचे अवाहन केले वरखेडी तांडा
येथील महिलांना मुख्यमंत्री माझी
लाडकी बहीण योजनेचा लाभ
मिळाला, याबाबत महिलांमध्ये
प्रचंड उत्साह पहायला मिळाला.
लाडकी बहीण योजनेचा लाभ
मिळवून दिल्याबद्दल उपस्थित
महिलांनी ना.पादकमंत्री अब्दुल सत्तार यांचे आभार मानले. याप्रसंगी
सिल्लोड चे माजी सभापती रामदास पालोदकर, जि.प.सदस्य गोपीचंद जाधव, पंचायत समितीचे सभापती धरमसिंग चव्हाण , शिवसेना गट नेता अक्षय काळे,शिवसेना शहरप्रमुख संतोष बोडखे, तहसीलदार मनीषा मेने,
 नायब तहसीलदार सतीश
भदाणे, जलसंधारण विभागाचे
सूर्यकांत निकम, सोयगाव नगर
परिषदेतील जंगला तांडा चे सरपंच
विनोद जाधव, विशाल चव्हाण,
सरपंचपतीसुरेश चव्हाण,बबलूशेट हाजी,श्रावण जाधव,उमर पठाण, विशाल चव्हाण,शफिक खा, शिवसेना महिला कार्यकर्त्यां, शिवसैनिक, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव यांनी बोलताना दिली.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *