नगरपंचायतने उपाययोजना करण्याची मागणी
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
मंठ्या मध्ये भटक्या व पिसाळलेल्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने नगरपंचायत प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. मंठा शहर आणि तालुक्यांत दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची समस्या विकट होत चालली आहे. शहरात कुत्र्यांच्या समस्या इतकी वाढली आहे की, रत्याने एकट्याने फिरणं देखील नागरिकांना कठीण झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर यावर उपाययोजना करण्याची मागणी
करण्यात आली आहे. काल दि ५/९ वार गुरूवार रोजी नगरपंचायत हद्दीत एकूण २२ ते२४
जणांचा भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला असून स्वामी विवेकानंद महाविद्यालयाला परिसरात व सर्वत्र पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस नगरपंचायत हद्दीत भटक्या कुत्र्याची संख्या कमालीची वाढत आहे. बातम्याच्या
माध्यमातून नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे; परंतु प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. शाळेत जाणारी लहान मुले, विद्यार्थी, बाजारात खरेदीसाठी येणारे ग्राहक, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ दहशतीखाली वावरत आहेत. या भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण करण्याची उपाययोजना केली गेली नसल्यामुळे मंठा शहर आणि तालुक्यांत भटक्या कुत्र्यांची समस्या बिकट बनली आहे. असेच वास्तववादी चित्र आहे. कुत्रा चावल्याने रेचीज सारख्या भयानक आजाराला सामोरे जावे लागते. निर्दोष माणसाचे प्राण देखील जाऊ शकतात एवढा गंभीर विषय असून देखील नगरपंचायत प्रशासन हा विषय गांभीर्य का घेत नाही असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
Users Today : 38