Khozmaster
1 Min Read
oplus_0
गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी मंठ्यात गर्दी
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मंठा  लाडक्या गणपतीच्या स्वागतासाठी आठवडाभरापासून सुरू असलेल्या खरेदीच्या उत्साहाने शुक्रवारी मंठा बाजारात उच्चांक गाठला.
शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. सजावटीच्या साहित्यापासून गौरी-गणपतीच्या
अलंकारांपर्यंत आणि पूजेच्या साहित्यापासून नैवेद्याच्या पदार्थांपर्यंतची खरेदी ग्राहकांकडून होत आहे. यामध्ये प्रामुख्याने उदबत्ती, धूप, कापूर, गंध, कुंकू, अष्टगंध, गूळ, खोबरे, खिरीचे गहू, उकडीच्या मोदकाचे पीठ, तांदळाचे पीठ, सुकामेवा यांचा समावेश आहे. किराणा दुकानांसह पूजा साहित्य विक्रीची दुकाने गर्दीने फुलून गेली होती.गणपती बुक करण्यासाठी छोट्या छोट्या गणेश मंडळाची मुले दुकानात जाऊन बघु लागले व भाव करून बुक करू लागले,
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *