छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे शुक्रवारी रोजी सायंकाळी गणेशोत्सव- ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर फर्दापूर पोलिस स्टेशन यांच्या वतीने येथील श्रीचक्रधर स्वामी मंदीरावर
पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे व उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांच्या मार्गदर्शनात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली.सपोनि प्रफुल्ल साबळे
यांनी गणेशोत्सव दरम्यान कार्यक्रमाची सविस्तर माहिती घेतली. ग्रामस्थांनी केलेल्या सुचनांवर पोलिस प्रशासनाकडून आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना संकेत साबळे व चाठे म्हणाले की, गणेश मंडळाने सुचनांचे काटेकोरपणे पालन करून ध्वनीप्रदुषण बाबतीत काळजी घ्यावी, डिजे लावण्यास परवानगी नसुन कायद्याचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील. सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोष्ट दिसुन आल्यास कायदा हातात न घेता फर्दापूर पोलिसांकडे संपर्क साधावा, महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी. गावात होर्डिंग्ज, कमान उभारण्याआधी लावण्यापूर्वी ग्रामपंचायत-नगरपंचायत ची परवानगी घेणे बंधनकारक आहे. शांततेची परंपरा कायम राखत संयमाने उत्सव साजरा करावा. गणेश मंडळाला कुठलेही गालबोट लागु नये यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे.आपल्याकडे जर पाहुणे आले तर आपण त्यांना एकटे सोडत नाही त्याप्रमाणे गणपती बाप्पानां एकटे सोडू नका काळजी घ्यावी असे आवाहन सपोनि प्रफुल्ल साबळे व उपनिरीक्षक सुग्रीव चाटे
यांनी केले. यावेळी बिट जमादार मिरखाॅ तडवी,पो.काॅ.शिवदास गोपाल,सरपंचपती शिवाआप्पा चोपडे,ग्रा.पं.सदस्य मोहन सुरडकर, मुख्याध्यापक योगेश चोपडे, उपसंपादक गोकुळसिंग राजपूत, पत्रकार दिलीप देशमुख,पोलिस पाटील विलास कुल्ले,प्रा जीवन कोलते पाटील, उपसरपंच मो आरिफ मो लुखमान जय सरस्वती गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष व सदस्य, शंभू राजे गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष व सदस्य,जय बजरंग गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष व सदस्य, जयभवानी गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष व सदस्य, शिवछत्रपती गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष व सदस्य, पुजारी मंडळी, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.