कर्जमाफीचीही केली मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली मागनी
शेतकर्यांना पिकविमे व कर्जमाफी मिळावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि.४जुलै२०२४ रोजी मेहकर येथे रास्ता रोको आंदोलन करन्यात आले होते.त्यावेळी पिकविमे जमा करन्यासाठी कंपनीच्या अधिकार्यांच्या वतीने लेखी आश्वासन देन्यात आले होते.त्यामध्ये दिनांक ३० जुलै पर्यंत खरिप तर १० ऑगष्ट पर्यंत रब्बीचे विमे जमा होतील असे कळवन्यात आले होते.तर त्यानंतर खुद्द कृषीमंत्री महोदयांनी ३१ ऑगष्ट पर्यंत सर्वच विमे जमा होतील असे जाहीर केले.परंतु सर्व तारखा उलटुनही आजवर शेतकरी वर्ग विम्याच्या पैशापासुन वंचित आहे.त्यामुळे विमा कंपनी तसेच कृषीमंत्री यांचेकडुनही शेतकर्यांची फसवनुक करन्यात आली असा आरोप यावेळी करन्यात आला.त्यामुळे विमा कंपनी सहीत कृषीमंत्र्यांवर फसवनुकीचा गुन्हा दाखल करावा अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागनी करन्यात आली.त्याचबरोबर शेतकरी मागील वर्षी खरीप व रब्बी दोनही हंगामातील पिके गमावल्यामुळे शेतकरी वर्गाचा आर्थिक कना पार मोडुन पडला आहे.त्यामुळे शेतकर्यांना विना अटी-शर्ती संपुर्ण कर्जमाफी देन्यात यावी अशीही मागनी निवेदनाद्वारे करन्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, जिल्हाकार्याध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील,मेहकर ता.अध्यक्ष धनंजय बुरकुल,चिखली ता.अध्यक्ष संजय अंभोरे, कार्यकारी सदस्य गजानन जाधव आदी मंडळी उपस्थित होते.ह्यावेळी अनेक शेतकर्यांच्या सह्यांचं निवेदन सादर करन्यात आले.