छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,०५
देशातील व राज्यातील ६० वर्षा वरील जेष्ठ नागरिकांनी आजारमुक्त व आरोग्यदायी जीवन जगून
आपला वृद्धापकाळ आनंददायी व निरोगी घालवावा
असे आवाहन जिल्हा आरोग्य समिती चे सदस्य व तंबाखू मुक्त तालुका समितीचे सदस्य जेष्ठ नागरिक धोंडीरामसिंह राजपूत यांनी येथील न्यू सन्मित्र कॉलनी त गुरुवार (ता,०५) रोजी केले, महाराष्ट्र शासनाच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालय मार्फत शहरात ६०वर्षावरील नागरिकांना आजारमुक्त जीवन जगण्यासाठी “टीबी विरुध्दच्या लढाईत विश्वसनीय बीसीजी लस” देण्याच्या कार्यक्रमात राजपूत बोलत होते, ते पुढे म्हणाले की,शहरात जागोजागी ही लस देण्याचा कार्यक्रम सुरू आहे, नागरिकांनी या ठिकाणी जाऊन लस घ्यावी व निरोगी जीवन जगावे,या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सेविका मीरा कुसळकर,कावेरी गुंड,व अंगणवाडी मदतनीस बेबी हासिम शेख उपस्थित होत्या,६०वर्षावरील नागरिकांचा सर्व्हे यापूर्वी झालेला आहे,न चुकता जेष्ठ नागरिकांनी ह्या लसीचे इंजेक्शन घ्यावे असे राजपूत यांनी आवाहन केले आहे .जेष्ठ नागरिक संघांनी आपल्या सदस्यांना ही लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे
असेही राजपूत म्हणाले,(फोटो कॅप्शन-न्यू सन्मित्र कॉलोनीत अंगणवाडी शाळेत बीसीजी।लस घेताना जेष्ठ नागरिक धोंडीराम राजपूत,आरोग्य सेविका मीरा कुसळकर, व कावेरी गुंड,अंगणवाडी सेविका बेबी शेख)