बार्शिटाकळी : बार्शिटाकळी शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त वाढली आहे सदर मोकाट कुत्रे रस्त्याने जाणाऱ्या लहान मुलांसह मोठ्यांना चावा घेत आहेत मोटरसायकलने जाणाऱ्यांच्या अंगावर धाऊन जात असल्याने अपघात सुध्दा घडत असल्याने नगरपंचायतने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
बार्शिटाकळी शहरामध्ये मोकाट कुत्रे मोठ्या संख्येने शहरातील विविध भागात वावरत आहेत. सदर रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लहान मुले, महिला व पुरुषांच्या अंगावर धावून चावा घेत असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात बार्शिटाकळी शहरात घडत आहेत. बऱ्याच लोकांना या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे त्यामुळे बाशिटाकळी शहरातील खासकरून लहान मूले महिला व पुरुषांनी मोकाट कुत्र्यांचा धसका घेतला आहे.
रस्त्याने बाईकवरुन जाणाऱ्यांच्या अंगावर हे मोकाट कुत्रे धावून जाऊन चावा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत यामुळे रस्त्यावर कुत्र्यांमुळे बरेच अपघात घडले आहेत व त्यामध्ये बरेच लोक लहान मुलांसह जखमी झाले आहेत. सदर प्रकार हा बार्शिटाकळी शहरातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे
तरी या संवेदनशिल प्रश्नावर आपण सहानुभूतीनं विचार करुन मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा व सदरची मोकाट कुत्रे पकडून त्यांना दूर जंगलात सोडून देण्याची कारवाई करण्यात यावी.
येत्या 15 दिवसात कारवाई करावी अन्यथा कार्यवाही न झाल्यास आम्हाला नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी. अशा प्रकारचे निवेदन बार्शिटाकळी मधील अकोला जिल्हा युवक कॉग्रेसचे प्रवत्के मो. शोएब मो. सिद्दीक यांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी पंकज सोनोने यांना देण्यात आले.