अकोला:- ( जिल्हा प्रतिनिधी )
बाळापूर पोलीस स्टेशनतर्गत येत असलेल्या पारस येथे एका ईसमाकडून १४ किलो गांजा व एक पिस्टुल राउंडसह साडे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई बाळापूरचे ठाणेदार अनिल जुमळे यांनी केली. बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुमळे यांनी मिळालेल्या गोपणीय माहितीनुसार पारस येथील अंकित प्रकाश इंदौरे वय २२ वर्ष यांचा राहता घरी गांजासदृश्य पदार्थांची विक्री तसेच एक अग्निसदृश्य सुरक्षा बाळगून आहे तरी अशा माहितीवरुन दोन पंचासह घराची झाडाझडती घेतली असता. वरील ईसमाचा घरामध्ये १५ किलो गांजा व एक देशी बनावटीचे देशी पिस्टूल एक राऊंडसह असा एकुन साडेचार, लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन सदर इसमावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. सदर ही कार्यवाही पोलीस अधिक्षक बच्चनसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिल जुमळे साहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे प्रियंका पाटील यांचासह गोपाल ठाकुर अनंत सुरवाडे अंकुश मोरे संजय टाले सोहेल खान निखील सुर्यवंशी सुरेश भारसाकळे यांनी सहकार्य केले.
पारस येथे १४ किलो गांजा एक पिस्टुलसह साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
0
8
9
4
7
5
Users Today : 5
Leave a comment