अकोला प्रती- डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी गट तट नव्हे तर पर्याय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आरपीआय पक्ष पुढे आणला असून त्याच अनुषंगाने यापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जात असलेले डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे काम करणार आहे.
डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्व व कार्य शैलीवर विश्वास ठेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी मध्ये आज शेकडो युवकांनी प्रवेश घेतला. शासकीय विश्रामगृह अकोला येथे नुकताच पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पश्चिम विदर्भ प्रमुख डॉक्टर अरुण चक्रनारायण यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्ष देवीलाल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महासचिव दिवाकर गवई ,भारतीय बौध्द महासभेचे जिल्हा महासचिव एम. एम. तायडे, दिनेश बोलके, हिम्मतराव सदाशिव,राजेश समुद्रे,यशवंत इंगोले
यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये व युवक आघाडी जिल्हाध्यक्ष उमेश इंगळे महासचिव महेंद्र भोजने यांच्या नेतृत्वात पार पडला. यावेळी कुणाल मेश्राम, संकेत सुर्यतळ, क्षितिज दामोदर, प्रवीण सोनवणे, अनिल सोनवणे, प्रतीक कांबळे, विजय धांडे, डॉ विजय इंगळे, जयकुमार दामोदर, सुमित तायडे,शुभम पायघन, किशोर कौस्कार,ओम प्रकाश इंगळे, शीलवंत वानखडे, प्रशांत गवई, विवेक नाईक, विजय धोंड, नरेंद्र रायबोले ,लखन धोंड, विकास खंडारे, राजेश तायडे, भीमजीवन शिरसाठ, रमेश तायडे, विठ्ठल इंगळे, विपुल ढोले, पवन रखराव, आशिष वानखडे, अनिल सोनोने, विकास खंडारे, इत्यादी विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला. यावेळी भारतीय बौध्द महासभेचे जिल्हा महासचिव एम. एम. तायडे, दिनेश बोलके हिम्मतराव सदाशिव,राजेश समुद्रे,यशवंत इंगोले आदि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे जिल्हा महासचिव महेंद्र भोजने यांनी केले तर आभार प्रदर्शन विवेक नाईक यांनी केले