धक्कादायक! मिरवणुकीतील लेझर शोमुळे तरुणाच्या डोळ्यात रक्तस्त्राव, तर पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्याला इजा

Khozmaster
1 Min Read

कोल्हापुरात गणेश आगमनाच्या मिरवणुकीत लेझरमुळे तरुणाच्या डोळ्यात रक्तस्त्राव झाला आहे. तर ड्युटीवर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्याला इजा झाली आहे.

जिल्ह्यात शनिवारी घरोघरी आणि मंडळांमध्ये लाडक्या बाप्पांच आगमन मोठ्या जल्लोषात आणि भक्तीमय वातावरण झाल. रात्री कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी डॉल्बीच्या दणदणाटात सर्व नियम धाब्यावर बसवत मंडळांनी गणपती बाप्पाचा आगमन मिरवणूक काढली. मात्र या मिरवणुकीचे वाईट परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. मिरवणुकीत झगमगाट आवाज आणि आकर्षणाचा केंद्र ठरलेल्या लेझर शोमुळे कोल्हापुरातील उंचगावमधील तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्त्राव झाला आहे. सोबतच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्यालाही गंभीर इजा झाली आहे. दोघांनाही उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *