प्रफुल्ल हे जिल्हाधिकारी कार्यालयात कर संकलक होते. ओजस व निशांत हे दोघे रविवारी सकाळी अबॅकसच्या शिकवणीला गेले. दुपारी १२.१५ वाजताच्या सुमरास प्रफुल्ल हे दोघांना मोपेडने घेऊन घरी जात होते. नामदेवनगर पुलाजवळ ट्रकने मोपेडला धडक दिली. ट्रकचं मागील चाक प्रफुल्ल यांच्या अंगावरुन गेलं. गंभीर जखमी झाल्यानं प्रफुल्ल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर ओजस व निशांत जखमी झाले. अपघातानंतर चालक ट्रक सोडून थेट यशोधरानगर पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यानं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी चालक संदीप लखन भुरीया (वय २५, रा.मालनवाडा,सिवनी) याला अटक केली. पोलिसांनी जखमींना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

Khozmaster
2 Min Read

राज्यात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग सर्वच राजकीय पक्षाने फुंकले आहे. अशातच काल गणरायांच्या चरणी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपलाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे साकडे घालत होते. पण अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी थेट अजित पवार यांना किंगमेकर म्हणत मुख्यमंत्री अजिदादा बनतील असे भाकित केले आहे. अमोल मिटकरी यांचे विधान युतीतील मित्रपक्षांना विधानसभेसाठी इशारा आहे का? असे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात महायुतीत सर्व काही सुरळित सुरु नसल्याचे दिसून येत आहे. अशातच अमोल मिटकरी यांनी एक नवे विधान केले आहे. अमोल मिटकरी म्हणाले, अजित पवार किंगमेकर होते , आहेत आणि राहतील तर आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारच मुख्यमंत्री म्हणून राज्याचे किंगमेकर राहतील असा थेट विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.

तर अजित पवार यांनीच बारामतीची निवडणूक लढावी अशी आमची आणि पक्षाची भूमिका असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्नीला बहिणीच्या विरोधात लोकसभेच्या निवडणुकीत उभे केले ही चूक झाली असं वक्तव्य करीत जाहीर खंत व्यक्त केली होती. मात्र यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवारांवर बोचरी टीका केलीय.जित पवार यांना स्वार्थी म्हणत संजय राऊत यांची पवारांवर टीकेची झोड उठवली. संजय राऊत म्हणाले, स्वार्थी लोकांना खंत वाटत नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संजय राऊतांवर पलटवार केलाय. संजय राऊत यांना अमोल मिटकरी यांनी रिकामटेकडा म्हणत टीका केली आहे. तर संजय राऊत हे आगलावे व्यक्ती आहेत असे विशेषण राऊतांना मिटकरींना दिले आहे. ठाकरे कुटुंब, पवार कुटुंब, आणि एकनाथ शिंदेंना शिवसेना पासून दूर करण्याचं काम संजय राऊतांनी केले असल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *