उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव येथे दि.६/९/२४ रोजी छत्रपती संभाजीनगर विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांच्या व मा.कामगार अधिकारी आंबट यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवासी राजा दिन व कामगार पालकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सोयगाव आगारामध्ये सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत प्रवासी राजा दिन साजरा करण्यात आला तर दुपारी २ ते ५ या वेळेत कामगार पालक दिन साजरा करण्यात येऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ छत्रपती संभाजीनगरचे नियंत्रक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.हि जवाबदारी राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची असून या अभियानाचा उद्देश प्रवासी व कामगार यांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष विभाग नियंत्रक यांनी ऐकून घेऊन त्यावर लवकरात लवकर तोडगा काढून तक्रारीचे निवारण करणे हा आहे. त्याअनुषंगाने सोयगाव आगारात छत्रपती संभाजीनगरचे नियंत्रक साहेब व
विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत प्रवासी व कामगार यांच्या अडी अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय योजना करून अडचणी तत्काळ सोडविण्याबाबत आगार प्रशासनास आदेश दिले व त्याबाबत मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रम प्रसंगी प्रवासी व जेष्ठ मार्गदर्शक आबासाहेब बाविस्कर, सुधीर कुलकर्णी तसेच वाहतूक निरीक्षक सतिश अंभोरे, स वा नी काकडे, वाहतूक नियंत्रक बागूल,वाडेकर, विसपुते, व चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. या वेळी मा. विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, कामगार अधिकारी आंबट साहेब यांनी प्रवाशांचे तसेच कामगारांच्या समस्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्याचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना आगार प्रमुख मनीष जवळीकर यांनी केली. आभार तसेच सूत्रसंचालन सतिश पाटील यांनी केले