पहाटेच्या वेळी हार्बर लाईनवरील लोकलसेवा अचानक ठप्प झाल्याने प्रवाशांना ऐक कामाला जाण्याच्या वेळी मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. पहाटे ५ वाजल्यापासून पनवेल स्थानकातून एकही लोकल सुटलेली नव्हती, सगळ्या गाड्या प्लॅटफॉर्मवर उभ्या होत्या. नेरुळ स्थानकादरम्यान काही तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे हार्बर मार्गावरील स्थानकांमध्ये मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर तब्बल दीड ते दोन तासांनंतर पनवेल येथून पहिली लोकल ट्रेन सुटली. सध्या हार्बर मार्गावरील वाहतूक उशिराने सुरु आहे.
पहाटे हार्बर मार्गावरील वाहतुकीला अचानक ब्रेक लागला. पनवेल स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी ५.१७ ची लोकल ६.३० झाले तरी स्थानकातच थांबलेली होती. यादरम्यान, स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी जमली. ट्रेन लेट असल्याने प्रवाशांना कामावर जाण्यास उशीर होत होता. परिस्थिती पाहून काही जण परत घरी परतली तर काही स्थानकातच लोकल सुरु होण्याची वाट बघत उभे होते. त्यामुळे हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.नेरूळ स्थानकादरम्यान अप डाऊन मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने हा खोळंबा झाल्याची माहिती आहे. नेरूळ स्थानकादरम्यान विद्युत पुरवठ्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर तांत्रिक बिघाड सोडविण्याचे प्रयत्न रेल्वेकडून सुरू होते.पण, तब्बल दीड ते दोन तास गाड्या एकाच जागी उभ्या होत्या. वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न रेल्वेकडून सुरू होते. अप डाउन दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. सीएसएमटी तसेच ठाण्याला जाणारी वाहतूकही ठप्प होती. त्यामुळे कामावर जायच्या वेळी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.पण, तब्बल दीड ते दोन तास गाड्या एकाच जागी उभ्या होत्या. वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न रेल्वेकडून सुरू होते. अप डाउन दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. सीएसएमटी तसेच ठाण्याला जाणारी वाहतूकही ठप्प होती. त्यामुळे कामावर जायच्या वेळी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.