जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जामनेर तालुक्यातील पहूर येथिल शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी संचलित तायक्वांडो क्लासचे खेळाडू तथा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी ईश्वर क्षिरसागर ,भूषण मगरे, दिनेश राऊत , वेदांत क्षिरसागर , सतीश क्षिरसागर , भावेश निकम हे खेळाडू पहूर गावा जवळील स्वतःच्या शेतात फिरायला गेले असता शेता जवळील विहीरीत एक माकड पडलेले दिसले . जीव मुठीत घेऊन वानर उपाशी विहीरीच्या कपारीत बसलेले होते .
सदर खेळाडूंनी क्षणाचा विलंब न करता आजूबाजूला मिळेल ते साहित्य भाजीपाल्याचे कॅरेट व दोरा आणून कॅरटे ला दोराच्या साह्याने विहिरीत सोडले . माकडाला दोर दिसताच दोराच्या साह्याने वर येऊन शेतात धूम ठोकली . माकडाला बाहेर काढून शेतात धूम ठोकतांना पाहून सर्व खेळाडूना आनंद गगनात मावेनासा झाला .
खेळाडूंनी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे असे उद्गार जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन चे सचिव अजित घारगे यांनी काढले .तर सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली घोंगडे , शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी चे सचिव हरीभाऊ राऊत संचालक ॲड संजय पाटील , किरण जाधव , शंकर भामेरे , प्रकाश जोशी यांनी खेळाडूचे कौतुक केले .