बार्शीटाकळी नगरपंचायत घनकचरा निविदा ची मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

Khozmaster
5 Min Read
 शहर प्रतिनिधी बार्शीटाकळी
 ई निविदा दिनांक १०/०९/२०२४ रोजी मध्ये जाहीर केलेल्या अटी व शर्ती रद्द करण्याबाबत व अटी व शर्ती रद्द करून पुन्हा निविदा लावणे बाबत मसुद अली खान असद अली खान यांनी केली कार्यवाहीची मागणी
याबाबत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली असून सदर तक्रार मध्ये असे नमूद आहे की बार्शीटाकळी नगरपंचायत च्या वतीने घनकचरा व सुका कचरा गोळा करून डेपोवर पोहोचविण्याकरिता निविदा लावण्यात आली आहे निविदेमध्ये खालील प्रमाणे मुद्दे आहे.सध्या स्थितीत घनकचरा व्यवस्थापन मध्ये चालू वर्षात सात ७ नगरपरिषद नगरपंचायत मध्ये घनकचराचे काम चालू (work in hand) कार्यरंभ आदेश मागितले आहे व दोन ब वर्ग नगरपरिषद मागितले आहे परंतु सात ७ नगरपंचायत व नगरपरिषद मध्ये काम चालू आहे हे नियम काय आहे?. ही अट काढण्यात यावी व संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदार सोबत संगणमत करून अश्याप्रकारची अट टाकलेली आहे ही अट निविदेमधून रद्द करण्यात यावी व याचा उल्लेख कोणत्याही परिपत्रकामध्ये अशी अट नमूद केली नाही.
निविदेमध्ये ईपीएफ नोंदणी प्रमाणपत्र व मागील कमीत कमी 100 कामगारांचे ईपीएफ प्रती महिना भरल्या गेल्याचे चालन जोडणे बंधनकारक आहे परंतु 100 मजुरांची आवश्यकता महानगरपालिका मध्ये असते सदर काम हे नगरपंचायत चे आहे व आपल्या इस्टिमेटला 100 मजूर दिलेले नाही त्यामुळे सदर काम कोणत्यातरी ठेकेदारांसाठी राखीव आहे असे वाटते आणि हा निवादे मध्ये मुख्यअधिकारी व संबंधित अभियंता यांनी घनकचर्याचे ठेकेदार सोबत संगणमत करून अशी अट टाकली आहे ही अट रद्द व्हावी.
निविदेमध्ये किमान एक कोटी रुपयांचे राष्ट्रकुत बँकेचे सर्वांची मागितली आहे ही अट सुद्धा रद्द व्हावी.
ISO प्रमाणपत्र बंधनकारक राहील आणि मागील सलग तीन वर्षाकरिता कीमान २५ कोटीची उलाढाल सी ए च्या प्रमाणपत्र मागितले आहे हे सुद्धा रद्द करण्यात यावी.
वायो कॅटलिस्ट प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील व वाहन स्वतःच्या मालकीचे असणे याचा पुरावा सादर करणे बंधनकारक राहील हा अट सुद्धा रद्द करण्यात यावी.
 महाराष्ट्र शासनाचे सेंद्रिय खताचे हरित महा सिटी कंपोस्ट ब्रांड चे ३ प्रमाणपत्र सादर करणे व नगरपंचायत बार्शीटाकळी कडे कोणत्याही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र मुख्यअधिकारी नगरपंचायत बार्शीटाकळी यांच्याकडून घेऊन टेंडर मध्ये लावण्याचे सांगितले आहे परंतु आपल्या नगरपंचायतचे थकबाकीचे प्रमाणपत्र महा टेंडरला लागू नाही कारण महाराष्ट्राच्या कंपन्या आपल्या नगरपंचायत ला प्रॉपर्टी घेणार का सदर अट गावातल्या ठेकेदार पूर्ती पाहिजे होती परंतु प्रमाणपत्र यासाठी ये ना या ठेकेदारावर प्रेशर टाकून टेंडर मॅनेज
करण्याची सदर तरतूद वाटते तरी माझी मुख्यअधिकारी साहेब यांना कोणाच्या प्रेशर मध्ये अशी अट टाकली आहे समजणे कठीण आहे व शासनाच्या नगररचना अधिनियम सिविल कोर्ट मध्ये ही नसल्यामुळे टेंडर मध्ये अशी अट न टाकता टेंडर रिकॉल करून नियम अटी लावण्यात यावे अशी अट सुद्धा रद्द करण्यात यावी ही विनंती. बार्शीटाकळी नगरपंचायत च्या हद्दीतील सर्व कामकाजाचा निविदा सोबत जोडलेल्या विहित परपत्रामध्ये GIO-TAG कृती आराखडे तयार करून तांत्रिक लिफॉफ्या सोबत सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा सदरची निविदा अपात्र ठरून रद्द करण्यात येईल व ESIC नोंदणी प्रमाणपत्र चालन सोबत जोडणे बंधनकारक आहे ही अट सुद्धा रद्द करण्यात यावी. मुख्याधिकारी व संबंधित अभियंता यांनी निविदेमध्ये अटी व शर्तीमध्ये तांत्रिक अडचण टाकून व ठेकेदार अशी संगणमत करून अशा प्रकार च्या अटी टाकून या ठेकेदाराला ठेका देण्याचे वाटते.घनकचरा ठेका एक वर्षासाठी अंदाजीत 1 कोटी 80 लाख रुपयाचे आहे हे ठेका पुर्ण CSR RATE मध्ये देण्याचे ठेकेदार सोबत मुख्यअधिकारी व संबंधित अभियंता यांनी संगणमत करून अगोदरच घनकचऱ्याचे ठेकेदाराला ठेका दिला होता व या वर्षात सुद्धा असेच प्रकारचे ठेका देण्यात चे दाट शक्यता आहे व शासनाचे कमी दरामध्ये न
देता पूर्ण CSR RATE मध्ये हे ठेका देण्याचे तयारीमध्ये मुख्यअधिकारी व संबंधित अभियंता आहे.
तरी हा निविदा ची अंतिम दिनांक १८/०९/२०२४ हे आहे परंतु त्यापूर्वी अटी व शर्ती रद्द करून व नव्याने निविदा बोलावण्यात यावी हा निविदेमध्ये अटी व शर्ती कोणत्याही परिपत्रिका नुसार टाकलेली नाही मुख्याधिकारी व संबंधित अभियंता यांनी मनमानी करून व त्यांचे मनमर्जीचे ठेकेदार ला हा ठेका देण्याकरिता अशा अटी व तांत्रिक अडचण निर्माण करून शासनाचे आर्थिक नुकसान करण्याचा उद्देशाने या निविदेमध्ये संगणमत केलेले आहे हे निविदा रद्द करावी व पुन्हा नवीन निविदा बोलावण्यात यावी जर ही निविदा रद्द ना केल्यास मी न्यायालयात खटला दाखल करणार व उपोषणलां सुद्धा बसेल याची जबाबदारी शासनावर राहील करिता तक्रार सादर केली आहे.या बाबत ची तक्रार
मसुद अली खान असाद अली खान यांनी दिली असून त्याची प्रतिलिपी मुख्याधिकारी नगरपंचायत
 डी.पी.ओ नगर प्रशासन विभाग कार्यालय अकोला.
जिल्हाधिकारी  अकोला.
 प्रधान सचिव पालिका प्रशासन मुंबई.ठाणेदार  पोलीस स्टेशन बार्शीटाकळी यांना देण्यात आले आहे
0 8 9 4 7 5
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *