काही मागण्या मान्य…पण रिझल्ट मिळेपर्यंत आंदोलन चालूच राहणार – रविकांत तुपकर

Khozmaster
1 Min Read
बैठकीत काय झाले…?
सोयाबन-कापूस दरवाढीसाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री श्री.अमित शहा यांची भेट घेणार
छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये पात्र असून लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा तातडीने लाभ देणार…
१५ सप्टेंबरपर्यंत खरीपाचा आणि ३० सप्टेंबरपर्यंत रब्बीचा राज्यातील संपूर्ण पिकविमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार…
शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ आणि विलंब करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करणार…
अतिवृष्टीची नुकसान भरपाई आचारसंहितेपूर्वी देणार…
शेडनेटच्या नुकसान भरपाई संदर्भात आता लवकरच स्वतंत्र नवीन धोरण आणणार…
अमरावती- नागपूर पट्ट्यात संत्रा- मोसंबीची मोठी गळती झाली आहे, त्याचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देणार…
सिंदखेडराजा ते शेगाव हा भक्तीमार्ग रद्द करण्याची ना.अजितदादा पवारांची घोषणा… लवकरच अधिसूचना काढणार…
जंगली जनावरांच्या त्रासापासून मुक्तता होण्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंडची योजना आणण्यासाठी कॅबिनेटमध्ये चर्चा करून निर्णय घेणार…
 नियमित कर्ज भरणाऱ्या पात्र शेतकऱ्यांच्या आधार प्रामाणिकरणासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान तातडीने देणार…
 यानंतर पेरणीपूर्वी पिककर्ज उपलब्ध करून न देणाऱ्या व पिककर्जासाठी सीबीलची अट लावणाऱ्या, अनुदानाचे पैसे होल्ड करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करणार…
 तुषार, ठिबक सिंचन, घरकूल, विहरी, कृषी अवजारांचे रखडलेल्या अनुदानासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून वितरित करणार…
शेतमजूर महामंडळ स्थापन करून शेतमजुरांसाठी विविध योजना राबविणार…
सरसकट कर्जमुक्तीसाठी सरकार नकारात्मक…
0 8 9 4 7 0
Users Today : 36
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *