मेहकर
संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या हक्काची अंमलबजावणी आज तागायत शासन करू शकले नाही यामुळे धनगर समाजाची आरक्षणाकरिता एसटी प्रवर्गातून मागणी जोर काढत आहे. मागील अनेक वर्षापासून सुरू असलेला संविधानात्मक लढा शासन दरबारी दखल घेतली जात नाही. त्यामुळे यापुढील आंदोलन उग्र स्वरूपाचे करण्यात येईल आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे असा निर्भीड आवाज उठवत यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोरकर यांनी शासनाला आरक्षण दिले नाही तर टावर वर जाऊन उडी मारण्याचा सजग दम दिला आहे. आरक्षण मागणी संदर्भाच्या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना धनगर समाजाच्या वतीने देण्यात आले आहे. पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मेहकर तालुक्यातील सकल समाज बांधवांनी महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त केला. पंढरपूर येथे विजय सर, गायके सर, दीपक बोऱ्हाडे, योगेश गणेश, माऊली हळणवार हे उपोषण करत आहे. सरकारने तीन दिवसात निर्णय घेतला पाहिजे.या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी मेहकर यांना गजानन बोरकर यांनी दिले आहे. यावेळी धनंजय रौंदळे, विनोद भुसारी, आश्रू शेळके, रमेश खोडवे, श्रीराम हुले, राजु नव्हळे, महादेव शेजुळ, अम ोल घाटोळ, गोविंदा शेळके, सुरेश काळे, ज्ञानेश्वर नव्हळे, ज्ञानेश्वर टाले, संदीप टाले, गोपाळ वैद्य उपस्थित होते.