श्रीराम फायनान्स कडून न्यू हायस्कूल येथील वाहन चालकांच्या ७५ पाल्य विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लाभ

Khozmaster
2 Min Read
बिजनेस मॅनेजर राम कड यांच्या प्रयत्नामुळे जालना जिल्ह्यातून सर्वाधिक शिष्यवृत्तीधारक लाभार्थी जाफराबाद चे
जाफराबाद.दि.१४.(विजय खरात) श्रीराम फायनान्स तर्फे दरवर्षी वाहनं चालकांच्या गुणवंत आणि गरजू विद्यार्थी पाल्यांना शालेय शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणून शिष्यवृत्ती दिली जाते त्याप्रमाणे यावर्षीही न्यू हायस्कूलच्या वरूड घायवट
 तालुका जाफराबाद येथील ७५ विद्यार्थ्यांना सन२०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थांच्या बॅक खात्यात ३,२५,००० रुपयांचे वर्ग आठवी ते दहावी साठी ४००० रुपये तर वर्ग अकरावी ते बारावी साठी ४५०० रुपये असे असून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात श्रीराम फायनान्स कंपनी अर्थसाहाय्य मिळाले आहे.हे अर्थसाहाय्य बारावी शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्तीच्या स्वरूपात पद्धतीने प्रदान केले जाते.
    श्रीराम फायनान्स तर्फे आयोजित जालना जिल्ह्यातून सर्वात जास्त शिष्यवृत्तीचा लाभ घेणारी शाळा म्हणून न्यू हायस्कूल,वरुड घायवट या शाळेचे नाव घेतलं जाते. यासाठी श्रीराम फायनान्स चे सर्व अधिकारी त्यामध्ये प्रामुख्याने श्रीराम फायनान्स चे विभागीय मॅनेजर श्री सचिन वडगावकर,छत्रपती संभाजीनगरचे ब्रांच मॅनेजर मा.शिवाजी सुकासे,सिल्लोडचे शाखा मॅनेजर स्वप्निल माळवे,कलेक्शन मॅनेजर अनिल उंबरे तसेच कॅशियर अण्णा मिरगे आणि जाफ्राबाद चे असिस्टंट बिजनेस मॅनेजर राम कड यांचे रजिस्ट्रेशन पासून ते विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्कॉलरशिप जमा होईपर्यंत मोलाचे मार्गदर्शन तसेच सहकार्य लाभले.
     न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या या शिष्यवृत्ती बद्दल पालकांमध्ये आनंदाने वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे पालक तथा शाळेचे मुख्याध्यापक संजय बल्लाळ, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख अनिल भोपळे आणि सर्व शिक्षक वृंद यांनी श्रीराम फायनान्स कंपनीचे आभार व्यक्त केले.
0 8 9 4 7 8
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *