कोल्हापूरकरांची प्रतीक्षा संपली; वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापुरात दाखल चाचणी पूर्ण; असे आहे वेळापत्रक

Khozmaster
3 Min Read

कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी बहुप्रतिक्षित असलेल वंदे भारत एक्स्प्रेस कोल्हापुरात दाखल झाले असून आठवड्यातून तीन वेळा धावणाऱ्या कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा सोमवारी 16 सप्टेंबर रोजी शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी वंदे भारत एक्सप्रेची चाचणी घेण्यात आली. कोल्हापूर – पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला नेमका किती वेळ लागतो ? या मार्गावर अन्य काही अडथळे आहेत का ? याची चाचणी घेण्यात आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूर स्थानकावर दाखल होताच कोल्हापूरकरांना वंदे भारत एक्सप्रेस सोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही…

असे आहे वंदे भारत एक्स्प्रेसच वेळापत्रक

संपूर्णपणे भारतीय बनावटीचे आणि अत्याधुनिक पणे तयार करण्यात आलेली वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस कोल्हापूरकरांना मिळाव यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. अखेर अनेक अडचणींवर मात करत कोल्हापूरकरांना पुणे कोल्हापूर मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस मंजूर झाली असून हुबळी ते पुणे आणि कोल्हापूर ते पुणे अशा दोन स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत.सोमवारी रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोल्हापूर रेल्वे स्थानकावर गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. कोल्हापूर – पुणे वंदे भारत दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी कोल्हापूर स्थानकातून सकाळी सव्वा आठ वाजता सुटेल आणि दुपारी दीड वाजता पुण्यात पोहोचेल. पुण्याहून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी २:१५ वाजता ही गाडी सुटेल आणि सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी ती कोल्हापुर स्थानकात दाखल होईल. ही एक्सप्रेस मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा या स्थानकावर थांबणार आहे.

कोल्हापूर पुणे या प्रवासाचे दर चेअर कार साठी ११६० रुपये आकारण्यात येईल तर एक्झिक्यूटिव्ह साठी२००५ रुपये आकारण्यात येणार आहेत. यामुळे अखेर कोल्हापूरकरांची वंदे भारत ची प्रतीक्षा संपणार असून लवकरच कोल्हापूर मुंबई मार्गावर देखील म्हणजे भारत एक्सप्रेस सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
चाचणी पूर्ण प्रतीक्षा प्रवासाची

या सर्व पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर पुणे मार्गावर प्रस्तावित म्हणजे भारत एक्सप्रेसची चाचणी पार पडली. आठ डब्यांची अत्याधुनिक भगव्या रंगाची वंदे भारत गाडी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर सकाळी ९:३० च्या सुमारास दाखल झाली आणि १० वाजून २५ मिनिटांनी पुण्याच्या दिशेने रवाना झाली. ही एक्स्प्रेस हायस्पीड ट्रेन असल्याने कोल्हापूर ते पुणे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला नेमका किती वेळ लागतो ? या मार्गावर अन्य काही अडथळे आहेत का ? याची चाचणी घेण्यात आली असून यावेळी पुणे मुंबईहून वरिष्ठ अधिकारी इंदुराणी दुबे, ब्रिजेश सिंह, मिलिंद हिरवे, रामदास भिसे, स्टेशन प्रबंधक मेहता आणि रेल्वे सल्लागार समितीचे शिवनाथ बियाणे उपस्थित होते.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *