रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या जालना जिल्हा उपाध्यक्ष पदी विजय खरात यांची निवड
रिपब्लि कन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ३० सप्टेंबर १९५६ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी स्थापना केलेला मुळ पक्ष ज्यामध्ये कोणताही गटतट नसून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळ संकल्पनेतून साकारलेल्या
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला पुनर्जीवित करून संपूर्ण देशभरात नव्या जोमात आणि अश्व गतीने वाटचाल करत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जालना जिल्ह्याच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी विजय पुंडलिक खरात तर मिलिंद हरिभाऊ रगडे बदनापूर तालुकाध्यक्ष पदी यांची महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ नेते तथा शिल्पकार दादाराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह ४८८ जालना येथे आज दिनांक १५ सप्टेबर २०२४ रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकि मध्ये जालना जिल्हा अध्यक्ष प्रेमानंदजी मत्ताजी मगरे यांच्या हस्ते आणि जाफराबाद तालुका अध्यक्ष दीपक हिवाळे,राजू मगरे,बबनराव बोर्डे,बालू बोर्डे,किशोर बोर्डे,मिलिंद रगडे,राजेश नावकर,सुनील शेजूळ,संदिप रगडे,देविदास मुळे,वाल्मिकी रगडे,सुशिल रगडे,गजानन दाभाडे आणि इतर असंख्य पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जालना जिल्ह्याच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी विजय पुंडलिक खरात तर मिलिंद हरिभाऊ रगडे बदनापूर तालुकाध्यक्ष पदी निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले.
Users Today : 11