ईद-ए-मिलाद च्या निमित्ताने आज मेहकर मधील मुस्लिम बांधवांची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या.

Khozmaster
1 Min Read

सर्वांना माझ्याकडून छोटीशी भेट म्हणून मिठाई आणि पाणी वाटप केले. त्यांच्या या उत्सवात सहभागी होऊन, त्यांच्या मनात माझ्याबद्दल असलेला बंधुभाव दिसला. प्रत्येक घरातील लहान थोरांनी आपुलकीने आणि प्रेमाने माझा स्वागत सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या पवित्र दिवशी अल्लाह कडे सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतो. पूर्वीपासून आपल्यात चालत आलेली बंधुता आणि सलोखा असाच अबाधित राहो, हीच माझी अल्लाह कडे मागणी आहे. सर्व मुस्लिम बंधू आणि भगिनींना माझ्याकडून ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा. यावेळी माझ्यासोबत शिवसेना जिल्हा उपप्रमुख आशिष रहाटे, मेहकर शहराचे शिवसेना शहरप्रमुख किशोर भाऊ गारोळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ॲड. साहेबराव सरदार तसेच ॲड. आकाश घोडे हे देखील उपस्थित होते.

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *