*महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस,मा.ना.अजितदादा पवार 19 सप्टेंबरला बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.*
*केंद्रीयमंत्री मा.ना.प्रतापराव जाधव यांनी केली कार्यक्रमस्थळाची पाहणी..*
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शहरातील महामानवांच्या पुतळांचे लोकार्पण आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथ जी शिंदे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार हे 19 सप्टेंबरला बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.
या कार्यक्रमस्थळाची पाहणी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केली.हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बुलढाणा शहरातील संगम चौकात उभारण्यात आला आहे
या शिवस्मारकासह शहरातीत 26 महामानवांच्या पुतळ्यांचे लोकार्पण तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील माता भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील केंद्रीय मंत्री आणि राज्य सरकारचे मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथील विश्रामगृहावर शिवसेना भाजप राष्ट्रवादी युतीच्या घटक पक्षाची आढावा बैठक केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाली.
त्यानंतर केंद्रीयमंत्री मा.ना.प्रतापराव जाधव यांच्यासोबत महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी स्थानिक शारदा ज्ञानपीठ येथील मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रम स्थळाची पाहणी केली संबंधित यंत्रणेला काही सूचना यावेळी करण्यात आल्या.
यावेळी आमदार श्री.संजय रायमुलकर,आमदार श्री.संजय गायकवाड,माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी,शांताराम दाणे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मान्टे,सचिन देशमुख राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲण्ड नाझेर काजी,महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अनुजाताई सावळे,शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
#Shivsena #Buldhana #शिवसेना #दौरा