गणपती विसर्जन मिरवणुकीत कार्यकर्त्याला उत्साह अनावर, नाचताना MLA सुरेश भोळेंना खांद्यावर उचललं, अन्…

Khozmaster
2 Min Read

जळगाव : राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणूक मंगळवारी शांततेत आणि उत्साहात झाली. भक्तीपूर्ण वातावरणात पुढच्या वर्षी लवकर या…चा जयघोष करत गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी मिरवणुकीत आमदार अन् मंत्र्यांनी देखील ठेका धरत गणेशभक्तांचा उत्साह वाढवला. मात्र, जळगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. एका उत्साही कार्यकर्त्यामुळे जळगावचे आमदार सुरेश भोळे खांद्यावरुन पडले असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. परंतु सुदैवाने भोळे यांनी काही दुखापत झाली नाही.

नेमकं काय घडलं?

जळगाव शहरात काल मंगळवारी गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात झाली. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे मिरवणुकीत सहभागी झाली होते. यावेळी गिरीश महाजन यांनी कार्यर्त्यांसोबत ठेका धरला. कार्यकर्त्यांबरोबर ते नाचू लागले. मग एका उत्साही कार्यकर्त्यांने आमदार सुरेश भोळे यांना मागून येऊन खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या कार्यकर्त्याला त्यांचा तोल सांभाळता आला नाही. यामुळे आमदार सुरेश भोळे त्याच्या खांद्यावरुन थेट पुढच्या दिशेने खाली पडले. त्यावेळी गिरीश महाजन आणि इतर कार्यकर्त्यांनी धाव घेतली आणि त्यांना उचलले. परंतु सुदैवाने आमदार भोळे यांना काहीच दुखापत झाली नाही. भोळे यांच्या चेहऱ्यावरुन ते चांगलेच संतापलेले दिसत होते.जळगाव शहरात सार्वजनिक गणेश मंडळाच्या मुख्य विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत चालल्या. जळगावात एकूण ७५ पेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले होते. वाजत गाजत जल्लोषात गणरायास निरोप देण्यात आला. शहरातील मेहरून तलावावर सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पाचे विसर्जन केले. ढोल ताशांचा गजरात वाजत गाजत पुढच्या वर्षी लवकर या जयघोष करत लाडक्या बाप्पाला गणेश भक्तांनी मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात निरोप दिला.

सुरेश धस यांंनी धरला ठेका

दरम्यान, भाजपाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी आमदार सुरेश धस हे काल आष्टी विधानसभा मतदारसंघातील काही भागांमध्ये दौरा करत असताना गणरायाला निरोप देताना मिरवणुकीवेळी सुरेश धस हे थिरकले. डीजे, ढोल बाजे पथक, बेंजो पथक हे मुख्य आकर्षण होते. यावेळी भाजप नेते सुरेश धस यांनी अनेक गणपती मंडळांना भेटी देत विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवत विविध गीतांवर ठेका धरला. याचा व्हिडिओ सध्याला सोशल माध्यमांवर ती व्हायरल होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *