काल या सोहळ्यात मेहकर मधील अनेक गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता, यादरम्यान मंडळांनी विविध सामुहीक आणि वैयक्तिक कलांचे प्रदर्शन केले. यामध्ये हलगी पथकाने वाजवलेल्या ठेक्यांवर सर्वांचेच पाय थिरकले. त्यांच्या या उत्कृष्ट सादरीकरणानंतर मुलींच्या एका पथकाने दोरी वरील योगासनांचे सादरीकरण केले. ते पाहत असताना अंगावर काटा उभा राहत होता. त्यानंतर मल्लखांब करणाऱ्या मुलांनी हातात पेटत्या मशाली घेऊन आपल्या साहसी मल्लविद्येचं जोरदार प्रदर्शन केलं. हे सर्व देखावे पाहून माझ्या आणि इतर प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल. या कलांची सर्वत्र वाढ आणि विकास होत राहो अशी माझी बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे. त्या सर्वांच्या कलागुणांना वाव आणि प्रोत्साहन मिळावे म्हणून माझ्यातर्फे सर्वांना रोख पारितोषिके दिली. याप्रसंगी स्टेजवर माझ्यासोबत शिवसेना जिल्हा उपप्रमुख आशिष रहाटे, मेहकर शहराचे शिवसेना शहरप्रमुख किशोर भाऊ गारोळे, तालुका प्रमुख लिंबा भाऊ पांडव, आकाश भाऊ घोडे आणि जाणू मानकर हे मान्यवर उपस्थित होते.