जालना : जालन्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. जालन्यात अंबडपासून १० किमीवर हा अपघात झाला आहे. वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाता पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. गेवराईहून अंबडकडे जाणाऱ्या बसने आयशर ट्रकला धडक दिली. त्यानंतर हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती होती की बस आणि आयशर ट्रकचा चक्काचूर झाला आहे. मोसंबी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक पलटी होऊन त्याचा चक्काचूर झाला आहे. तर बसदेखील पूर्णपणे फुटली आहे.जालना आणि वडीगोद्रीदरम्यान शहापूर गाव आहे. तिथे हा अपघात झाला. गेवराईकडून बस अंबडकडे जात होती. त्यावेळी विरुद्ध दिशेने, जालन्यावरुन समोरुन येणारा मोसंबीने भरलेला आयशर ट्रक यांची समोरासमोर धडक झाली आहे. बसमध्ये एकूण २० ते ३० प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहे. जखमींना अंबड शहरातील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात अतिशय भीषण झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. त्यामुळे अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.