सविस्तर वृत्त असे की अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीने आयोजित केलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सोहळा व १४ वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक १७/१८ सप्टेंबर रोजी प्रणव श्रीमंगल कार्यालय लातूर येथे संपन्न झाले या अधिवेशनामध्ये निजामाच्या गुलामगिरीतून मराठवाडा मुक्त करून मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिल त्या थोर वीर महापुरुषांच्या वीरपत्नी, वीरमातां, वीरपिता, व त्यांच्या परिवारांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान व गौरव करण्यात आला या दिमागदार सोहळ्यामध्ये संपूर्ण देशामधून आलेल्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला २०२३/२० २४ या वर्षांमध्ये सर्वोत्कृष्ट महिला/ पुरुष कार्यकर्त्यांनी काम करीत असताना सामाजिक सलोखा जोपासून समाजकार्यासाठी सेवा करत असताना अमुल्य योगदान दिले त्याचबरोबर सर्व घटकातील महिलांना पिडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचे काम केलं त्या पदाधिकाऱ्यांचा शहीद चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे राहत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या मा.सौ.रेखाताई मनेरे यांनी संघटनेच्या माध्यमातून पिडित महिलांना न्याय मिळवून दिला संघटनेच्या कामाला गती दिली संघटनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या शिफारशीनुसार रेखाताई मनेरे यांना शहीद चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे..? या दोन दिवस व राष्ट्रीय अधिवेशनास राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव देशमुख राष्ट्रीय सरचिटणीस अमोलजी नानाजकर राष्ट्रीय सरचिटणीस राजू पाटील सिपांळकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्र पाटील प्रदेशाध्यक्ष अँड राणीताई स्वामी प्रदेश अध्यक्ष पंडितराव तिडके प्रदेश निवड कमिटी अध्यक्ष अनिल दादा देसले प्रदेश अध्यक्ष सैनिक विभाग उल्हास दादा पाटील व मराठवाडा विभागीय अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत सोयगाव यासह अनेक मान्यवराच्या शुभ हस्ते सामाजिक कार्यकर्तेत्या मा.सौ.रेखाताई मनेरे यांना शहीद चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते जिल्ह्यामध्ये सर्वत्र त्यांच्या कार्याचे अभिनंदन होत आहे