*देशातील पहिलीच बौद्ध पत्रकारांची आंबेडकरी वॉईस मिडिया फोरम् संघटना स्थापन*

Khozmaster
3 Min Read
जालना : भारतातील बौद्ध पत्रकारांचा न्याय हक्काचा लढा लढवण्यासाठी पत्रकारांच्या पाठिमागे खंबीरपणे उभी राहणारी आंबेडकरी वॉईस मिडिया फोरम् या संघटनेची महत्त्व पूर्ण बैठक आज दिनांक २४/०९/२०२४  रोजी विश्राम भवन शेगाव येथे Ib7 न्यूज चॅनल चे संपादक उत्तमजी वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी देशातील सामाजिक,धार्मिक,आर्थिक,शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्राबरोबर पत्रकारिता क्षेत्रावरील एकूणच आव्हानात्मक घडामोडीवर सविस्तर चर्चा झाली.
लोकशाहीत देशाचा चौथा आधारस्तंभ असलेल्या मिडिया चा पाया म्हणजेच पत्रकार,पत्रकार सक्षम व निर्भीड बनवण्याचा प्रयत्न करून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना येणाऱ्या विविध अडचणीवर सखोल चर्चा करून यावर तोडगा काढण्यासाठी कुठं-कुठल्या उपाययोजना करणे गरजेचे आहेत यावर चर्चा होऊन पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक बौद्ध पत्रकार बांधवांसाठी शासन दरबारी राबवल्या जात असलेल्या विविध सुख सुविधा आणि सोयी ज्या की,आपल्या हक्काच्या या पत्रकार बांधवांना कशा उपलब्ध करून देता येईल यावर चर्चा करून संबंधित पत्रकारावर जर कुठला अन्याय अत्याचार,आपत्ती किंवा एखाद्या दुर्जर आजाराने त्रस्त पत्रकाराला शासन दरबारी न्याय, मदत मिळवून देण्यासाठी आपली संघटना कशी काम करेल यावर सविस्तर चर्चा होऊन तळागाळातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तन-मन-धनाने काम करेल अशी ग्वाही देतानाच पत्रकारांना दर्जेदार मार्गदर्शन, प्रशिक्षित करून आप-आपल्या कार्यक्षेत्रात भरिव तसेच भक्कम पणे आपल्या पत्रकारांना उभं करण्यासाठी पत्रकारिते व्यतिरिक्त आणखी इतर व्यवसायिक प्रशिक्षण देऊन आर्थिक सबलता निर्माण करण्यासाठी संघटना कटिबद्ध राहून काम करेल अशी ग्वाही देऊन पत्रकार बांधवांना विमा संरक्षण, दवाखान्याच्या सुख सुविधा,प्रवासाच्या पासेस्,शासकीय निवाऱ्याची व्यवस्था आणि शासन दरबारी पत्रकारांच्या नोंदी यावर पक्ष संघटना जोमाने काम करेल अशी हमी संघटना देत आहे.
दरम्यान आजच्या बैठकीमध्ये सर्वानुमते केंद्रीय कार्यकारणी ची निवड करून Ib7 न्यूज चॅनल चे संपादक उत्तमजी वानखेडे (जळगाव जामोद) यांची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष,निरंजन मेंढे केंद्रीय उपाध्यक्ष आणि केंद्रीय महासचिव पदी प्रकाशजी सरदार भुसावळ (जळगाव खान्देश),तर केंद्रीय संघटक पदी विजयजी खरात (मराठवाडा ) केंद्रीय प्रसिध्दी प्रमुख किरण मोरे आणि केंद्रीय सल्लागार पंडित परघरमोर यांची निवड करण्यात आली.
यांसोबत महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीत
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी महेंद्र सावंग बुलढाणा,महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी देवचंद समदूर शेगाव,तर उपाध्यक्षपदी संतोष निर्भवणे (ठाणे),सहसचिव पदी संघरत्न सपकाळे भुसावळ(जळगाव खान्देश),राज्य कोषाध्यक्ष पदी दिगंबर कंकाळ बुलढाणा,राज्य संघटक पदी राहुल झोटे (देऊळगाव राजा)व राज्य सल्लागार म्हणून उमेश शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली तसेच विदर्भ प्रमुख म्हणून किरण उपाध्ये पुलगाव तर
 बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी उल्हास शेगोकार यांची नियुक्ती करण्यात आली
यावेळी उपस्थित पत्रकार देवचंद्र हरिश्चंद्र मोरे मलकापूर,प्रशांत हेरोळे (कुरा मुक्ताईनगर) सुमित दामधर संग्रामपूर,राजेश राऊत देवडी,मुकेश हेरोडे खामगाव,उदयभान दांडगे संग्रामपूर,सतोष लक्ष्‍मण धुरंधर खामगाव,सागर शिरसाट शेगाव,रवी शेगोकार शेगाव,सुभाष वाकोडे कनारखेड शेगाव,राजवर्धन शेगांवकर,पदाधधिकारी शेगाव,श्याम पहूरकर भोनगाव शेगाव,पंडित परघरमोर शेगाव,नारायण दाभाडे शेगाव,प्रल्हाद खोडके डोनगाव,सतीश दांडगे मलकापूर,अनिल खराटे मोताळा,गोपाल इंगळे वरवट संग्रामपूर,कैलास खराटे बुलडाणा,एन.के.हिवराळे मलकापूर,राजेश राऊत देवळी वर्धा,महादेव धवसे,गौतम इंगळे
आदी पत्रकारांची उपस्थिती होती.
 पुढील केंद्र व राज्याच्या नियुक्त्या हे केंद्र व राज्याचे पदाधिकारी करतील त्यामुळे ज्या इच्छुक पत्रकारांना संघटनेत सामील व्हायचे आहे त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संपर्क साधण्याचे आवाहन राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार यानी केले आहे.
0 6 2 5 8 3
Users Today : 219
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *