जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. अशातच मराठा बांधवांशी मनोज जरांगे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा आग्रहाने मांडली. त्यानंतर उपोषण मागे घेण्याबाबात उपस्थित मराठा बांधवांना विचारलं. त्यानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय मनोज जरागेंनी घेतला. आपल्या जातीशी, आपल्या लेकरांशी धोका करून पुन्हा नेत्यांच्या मुलांना मोठं करू नका, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे, असं जरांगे म्हणाले.
जरांगे यांचं उपोषण स्थगित
राज्यभरातून मराठा समाज अंतरवालीकडे येत आहेत. त्यामुळे आता जरांगे पाटील 4 वाजता उपोषण सोडणार आहेत. उपोषण स्थगित करणार आहेत. जरांगेंना भेटण्यासाठी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज मुस्लिम समाजबांधवांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी अशी विनंती केली. यावेळी या मुस्लिम बांधवांना अश्रू अनावर झाले होते.
मी आता हॉस्पिटलमध्ये जाणार आाहे. मला 10- 12 दिवस आरामाची गरज आहे. त्यामुळे दवाखान्यात कुणी येऊ नका. मी जरा आराम करतो. त्यानंतर अंतरवलीला आलो की भेटू. आरक्षण मिळवल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही, असं जरांगे म्हणाले. ज्यांनी त्रास दिला. त्यांना सरळ करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तर देवेंद्र फडणवीसजी, तुम्ही हाताने सत्ता घालवू नका, असंही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
मनोज जरांगे काय म्हणाले?
एकाही नेत्याच्या सभेला जायचे नाही. कोण्या नेत्याने दबाव आणला लोकसभेला जसे मराठ्यांनी केले तसे करायचे. न्यायालयाच्या आदेशानुसार उपोषण उपचार घेऊन उपोषण करण्यापेक्षा उपोषण सोडावे का? असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला विचारला. त्यानंतर समाजाने त्यांना सकारात्मकता दाखवली. त्यानंतर जरांगे पाटील 5 वाजता उपोषण सोडणार आहेत. मराठा बांधव अंतरवलीत येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जरांगे उपोषण सोडतील.