बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाचे मंगळवारी कानपूरमध्ये आगमन झाले.यावेळी विमानतळावर मोठ्या संख्येने चाहत्यांनी उपस्थित राहत भारतीय खेळाडूंचे जल्लोषात स्वागत केले.भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चेन्नई येथील पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली.आता 27 सप्टेंबरपासून कानपूर येथे दोन्ही संघ दुसऱ्या कसोटीत भिडतील. हा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, या सामन्यातील पहिल्या दोन दिवशी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.कानपूरमध्ये भारतीय संघाने कसोटीमध्ये दमदार कामगिरी केली आहे. येथे भारताने एकूण 23 कसोटी सामने खेळताना 7 सामने जिंकले असून, 3 सामने गमावले आहेत. तसेच, 13 सामने बरोबरीत सोडवले आहेत.
बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध भारतात ठिकठिकाणी बांगलादेश क्रिकेट संघाचा विरोध होत आहे.शुक्रवारपासून कानपूर येथे भारत-बांगलादेश कसोटी सामना रंगणार असून, 6 ऑक्टोबरला ग्वाल्हेर येथे भारत-बांगलादेश यांच्यात टी-20 सामना रंगेल.ग्रीन पार्कचा परिसर हा सेक्टर, झोन आणि सब-झोन अशा तीन विभागांत विभागला गेला असून, याचे नियंत्रण अनुक्रमे डीसीपी, एडीसीपी आणि एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविले आहे. तसेच, पोलिसांनी सोशल मीडियावरही लक्ष ठेवले आहे.बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह.
टीम इंडियाचे कानपूरमध्ये जोरदार स्वागत; रोहित शर्मा-विराट कोहलीने वेधलं चाहत्यांचं लक्ष
Leave a comment