मराठा आरक्षणाच्या लढाई साठी उपोषणास बसलेले मनोज दादा जरांगे यांच्या समर्थनार्थ पुकारलेल्या जालना जिल्हा बंदला मंठा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाल्या नंतर सकल मराठा समाजाच्या वतीने आज दूपार पासून सर्व दूर मुसळधार पाउस असतानाही जालना नांदेड महामार्गावर मंठा तालुक्यातील केंधळी येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.व वाकडी धरणांमध्ये सकल मराठा समाज बांधवांनी जल समाधी आंदोलन करण्यात आले मराठा समाजास ओबीसी कोठ्यातून आरक्षण मिळावे या साठी मागील १ वर्षा पासून मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वा खाली नेते वगळता संपूर्ण मराठा समाज एकवठला असून या साठी मोर्चा, धरणे, बंद, उपोषण ही आंदोलनात्मक पावले उचलली
मनोज दादा जरांगे पाटील यांच्या…
अंतरवली सराटी मधून सुरू झालेला हा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत असून मनोजनदादा जरांगे हे मागील नऊ दिवसा पासुन अंतरवाली सराटी मध्ये सहाव्यांदा आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली असल्याने त्यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने तिन दिवसा पूर्वी जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला पाठिंबा देण्यासाठी मंठा तालुक्यातील व शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीनेही मंठा तालुका बंद ची हाक देण्यात आली होती. या बंदमध्ये शहरातील सर्वच भागातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने १०० टक्के बंद ठेऊन पाठिंबा दर्शवला होता. मागील उपोषणा प्रमाणे यावेळेस शासनाने जरांगे यांच्या उपोषणा कडे गांभीर्यान न पाहिल्याने व शासनाचा प्रतिनिधीही उपोषणा कडे फिरकत नसल्याने त्यांचे उपोषण नऊ दिवसा पासून सुरूच असून त्यांची प्रकृती खालावत जात आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सरकारचे लक्ष उपोषणा कडे वेधण्यासाठी आज मंठा तालुक्यातील पंचक्रोशीनमधील सकल मराठा समाजाच्या वतीने सह राज्यभर प्रचंड अतिवृष्टी सुरू असताना जालना नांदेड महामार्गावर रोड वरील केंधळी येथे
रास्ता रोको आंदोलन करण्यात आला व मंठा तालुक्यातील वाकडी धरणांमध्ये सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले या वेळी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार सोनाली ताई जोंधळे यांना निवेदन देण्यात आले