जळगाव येथील जिल्हा पेठ व्यायाम शाळेत आयोजीत तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत पहूर येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी च्या ५ तायक्वांडो पटुनी सहभाग घेऊन ३ सुवर्ण पदका सह २ रौप्य पदक प्राप्त केले
पहूर येथील शौर्य स्पोर्टस अकॅडेमीच्या गौरी विजय कुमावत, लोचणा श्रीकृष्ण चौधरी हरीष शामराव घाटे यांनी सुर्वणपदकावर मोहोर उमटविली असून त्यांची तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेतर्फे आयोजित ३४ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय वरिष्ठ पुरष व महिला तायक्वांडो स्पर्धा २८ व ३० सष्टेंबर रोजी लातूर या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे .
आज झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धेत भुषण रमेश मगरे व ईश्वर क्षिरसागर यांनी रौप्य पदकाची कमाई केली . या खेळाडूंना शौर्य स्पोर्टस् अकॅडेमीचे संचालक तथा तायक्वांडो प्रशिक्षक हरिभाऊ राऊत यांचे मार्गदर्शन लाभले .
पहूर सारख्या ग्रामीण भागातील स्पर्धकांनी तायक्वांदो स्पर्धेत मिळविलेल्या देदीप्यमान यशाबद्दल त्यांचे शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी चे उपाध्यक्ष बाबुराव आण्णा घोंगडे , जळगांव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव अजित घारगे , सावित्रीबाई फूले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे अकॅडमीचे संचालक ॲड संजय पाटील , शंकर भामेरे , प्रकाश जोशी, सुनिल पवार , कल्पना बनकर , किरण जाधव ,श्रीकृष्ण चौधरी, जयेश बावस्कर यांच्यासह सर्वच स्थरातील मान्यवरांनी अभिनंदन केले