वैजापूर येथे काही कृषी केंद्रातून शेतकऱ्यांना चढ्या दराने खत विक्री होत असल्याच्या तक्रारी सुरू आहेत. या स्थितीत संबंधित कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२५/९/२४ रोजी छत्रपती संभाजीनगर कृषी विभागाने वैजापूर व वैजापूर परिसरातील खत विक्रेत्यांकडे जाऊन तपासणी केली असून, रासायनिक खत विक्रेत्यांची प्रत्यक्ष रासायनिक खत साठां e-pos वरील शिल्लक साठा याची पडताळणी केली जादा किंवा चढ्या दरात युरिया विक्री न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.तपासणीत कृषी सेवा केंद्रातील व्यवहार, खतसाठा, विक्री रजिस्टर, बिलबुकाची प्रत्यक्ष पाहणी केली. रजिस्टर व बिलासंदर्भात काही सूचनाही खत विक्रेते, कृषी केंद्रचालकांना दिल्याची माहिती मिळाली.पुढे आता रब्बी हंगामास सुरुवात होणार असून, रासायनिक खते,युरियाची आवश्यकता भासत असल्याने शेतकरी कृषी दुकानात जाऊन युरियाबाबत विचारणा करीत आहेत. मात्र, युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. युरिया हवा असेल तर, इतर खतेही खरेदी करा. तरच युरिया देतो अशा तक्रारी होत्या. वैजापूर तालुक्यात रासायनिक खते उपलब्ध असून त्यापैकी युरियाचा साठा उपलब्ध आहे.युरियाचा अतिवापर हानिकारक शेतकऱ्यांनी कपाशीसाठी पेरणी करताना २० किलो युरिया, ५० किलो डीएपी, व ४० किलो पोटॅश अशा प्रमाणात खताची आवश्यकता असते. जास्त प्रमाणात युरिया खत दिल्यास पिकाची कायिक वाढ होते. मात्र रसशोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी आदी किडींचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी कीटकनाशकांवर खर्च वाढल्याने उत्पादन खर्चातही वाढ होते. म्हणून शेतकऱ्यांनी युरियाचा अति वापर न करता, इतर मिश्र व संयुक्त रासायनिक खतांचा माती परीक्षण अहवालाप्रमाणे वापर करणे अपेक्षित आहे, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर कृषी विभागाने केले आहे.मा. कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील सर जि. प. छत्रपती संभाजी नगर व कृषी अधिकारी, जगदीश लाळे,जे.डी.वाघमारे पंचायत समिती वैजापूर यांनी आज वैजापूर येथील रासायनिक खत विक्रेत्यांची प्रत्यक्ष रासायनिक खत साठा व e-pos वरील शिल्लक साठा यांची पडताळणी करून कृषी सेवा केंद्र तपासणी केली व संबंधित दुकानदारांना रासायनिक खतामधील तफावती बाबत चार दिवसात लेखी खुलासा करण्याबाबत नोटीस संबंधित विक्रेत्यास कडक इशारा देण्यात आला आहे.