प्रेयसीसोबत वाद, नंतर विवाहितेवर चाकूने सपासप वार; बॉयफ्रेंडचा पोलिसांना फोन अन्…

Khozmaster
2 Min Read

जळगाव : सध्या राज्यामध्ये विविध ठिकाणी प्रेम प्रकरणावरुन गुन्ह्याच्या अनेक घटना उघडकीस आले आहेत. असाच प्रकार भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे समोर आला आहे. २८ वर्षीय विवाहितेवर चाकूने वार करून तिची राहत्या घरी हत्या करण्यात आली आहे. तरुणीची हत्या केल्यानंतर संशयिताने स्वतः फोन करून पोलिसांना याबाबत माहिती दिली.

काय आहे नेमकं प्रकरण?

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे २८ वर्षीय सोनाली कोळी या विवाहितेची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे, ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. सोनाली महेंद्र कोळी, वय २८, राहणार भवानीनगर साकेगाव तालुका भुसावळ असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेतील संशयित सागर कोळी याने हत्या केल्याची माहिती स्वतःहून पोलिसांना दिली. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.सोनाली कोळी ही तरुणी दोन मुलं आणि एका मुलीसह साकेगाव येथील भवानी नगरात राहते. मजुरी करणारे तिचे पती महेश कोळी हे गावातच त्यांच्या आईसोबत राहतात. दरम्यान सोनाली कोळीकडे सागर कोळी यांचे नियमित येणे – जाणे होते. या दोघांचे प्रेमप्रकरण असल्याने २५ सप्टेंबरला रात्री साडेअकरा वाजता सागर तिच्याकडे आला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यातून सागरने धारदार चाकूने सोनालीच्या पोट, पाठ आणि उजव्या हातावर वार केले.सोनालीने आरडाओरड केल्याने शेजारील रहिवासी विनोद सुभाष कुंभार तेथे धावून आले. वाद सोडवताना त्यांच्या उजव्या हाताच्या पायाला चाकू लागला. आरोपी सागरने त्यांनाही तुला मारून टाकेल, अशी धमकी दिली. सागरने केलेल्या हल्ल्यानंतर सोनाली रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला आनंद ठाकरे यांनी वाहनातून भुसावळ येथील ड्रामा केअर सेंटरमध्ये हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासून तरुणीला मृत घोषित केले.

प्रियकरानेच दिली पोलिसांना खून केल्याची माहिती

सोनालीवर चाकूने वार केल्यानंतर सागरने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात स्वतःहून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. काही वेळातच पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी येत, त्यांनी सागरला ताब्यात घेऊन चाकू जप्त केला. सुरक्षारक्षक विनोद सुभाष कुंभार यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *