ठाणे (उल्हासनगर) : भारतात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत आहेत. मात्र त्यावर अद्याप कायमस्वरूपी तोडगा काढण्यात राजकारणी आणि प्रशासनला अपयश आलं आहे. त्यामुळे वेळोवेळी ठिकठिकाणी अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना ताब्यात घेतल्याच्या बातम्या समोर येत असतात. यातच उल्हासनगरमधून पोलिसांनी चक्क एका बांगलादेशी पॉर्नस्टारला अटक केली असून, रिया असं तिचं नाव आहे. विशेष म्हणजे, या पॉर्नस्टारचं अख्खं कुटुंबच बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘भारतीय’त्वाची ओळख मिरवत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून ही पॉर्नस्टार आणि तिचं कुटुंब उल्हासनगरमध्ये वास्तव्य करून होतं. पण रियाच्याच एका मित्रामुळे त्यांचं सगळं पितळ उघडं पडलं. प्रशांत मिश्रा नावाचा रियाचा मित्र या सगळ्यासाठी कारणीभूत ठरला. प्रशांत मिश्राला अचानक एक दिवशी रिया बांगलादेशची रहिवासी असून भारतात बैकायदेशीररीत्या राहत असल्याचं समजलं. त्यानंतर त्याने पोलीस स्टेशनम्ध्ये तक्रार केली आणि पोलिसांनी लागलीच रियाची कागदपत्रं तपासून कारवाई सुरू केली आहे.सदर पॉर्नस्टार उल्हासनगरमध्ये रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे या मराठी नावाने राहात होती. उल्हासनगरमधील हिल लाईन पोलिसांनी तिला बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. रिया, तिची आई, तिचा भाऊ आणि तिची बहीण अशा सगळ्यांनीच खोट्या कागदपत्रांच्या मदतीने भारतीय नागरिकत्व मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.पॉर्नस्टार रिया बर्डे हिला आरोही बर्डे आणि बन्ना शेख या नावानेही ओळखले जाते. रिया मूळची बांगलादेशी असून ती तिची आई, भाऊ आणि बहिणीसोबत बेकायदेशीरपणे भारतात राहिल्याचा आरोप आहे. यासाठी रियाच्या आईने अमरावती येथील एका व्यक्तीशी लग्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी रियाशिवाय तिची आई अंजली बर्डे उर्फ रुबी शेख, वडील अरविंद बर्डे, भाऊ रवींद्र, उर्फ रियाज शेख आणि बहीण रितू उर्फ मोनी शेख यांनाही आरोपी केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रियाची आई अंजली ही बांगलादेशची रहिवासी आहे आणि ती तिच्या दोन मुली आणि मुलांसह भारतात बेकायदेशीरपणे राहत होती. रियाच्या आईने पश्चिम बंगालचा असल्याचे सांगून अमरावती येथील रहिवासी अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केले. तिने नंतर तिची भारतीय ओळख सिद्ध करण्यासाठी स्वतःसाठी आणि मुलांसाठी बनावट जन्म प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे सादर करून भारतीय पासपोर्ट मिळवला. दरम्यान, रियाला यापूर्वी वेश्याव्यवसायाशी संबंधित एका प्रकरणात अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.