शेतकऱ्याने हाताने रस्ता कोरला, पालकमंत्र्यांच्या मतदार संघात रस्त्याचे तीन-तेरा, Video व्हायरल

Khozmaster
3 Min Read

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील शिंदे सरकारमधील असलेले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात लाखो रुपये खर्च करून रस्ता तयार करण्यात आला. मात्र पावसाने या रस्त्याचे पितळ उघड झालं आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जळगाव जिल्हा म्हटलं म्हणजे, तीन मंत्री कॅबिनेट, एक केंद्र राज्यमंत्री असलेला जळगाव जिल्हा आहे. या जिल्ह्याला कधी नव्हे इतके मंत्रीपद या काळात मिळाले. शिंदे सरकार आल्यापासून पालकमंत्री गुलाबराव पाटील हे प्रत्येक भाषणामध्ये मोठमोठ्या लाखोंच्या गोष्टी सांगत असतात. कधी नव्हे एवढ्या दोन वर्षांमध्ये शिंदे सरकारच्या काळामध्ये मतदार संघामध्ये कोटींचे विकास काम केली असल्याचं सांगण्यात येतं. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती बघितली असता या व्हायरल झालेल्या व्हिडिओतून सत्य परिस्थिती समोर आली आहे.जळगाव तालुक्यातील भोकर ते पळसोद हा ग्रामीण मतदार संघ शिवसेनेचे मुलूख मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा आहे. या मतदारसंघाचा एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन व्यक्तींनी अक्षरश: डांबरीकरण झालेल्या रस्ता हाताने कशा पद्धतीने निघत आहे. कशा पद्धतीने साहित्य वापरण्यात आलेले आहे, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे.लाखो रुपये खर्च करून शासनाच्या तिजोरीवर बोजा टाकला जातो. मात्र रस्त्यांचा दर्जा कधीही सुधारलेला नाही. ठेकेदाराचे भले करण्यासाठी लाखोंची टेंडर भरले जातात, देवाण-घेवाण केली जाते. पण रस्त्याचा निकृष्ट दर्जा हा पहिल्या पावसाळ्यात दिसून येत असतो आणि तोच निकृष्ट दर्जा या जळगाव ग्रामीण मतदार संघातील भोकर ते पळसोद रस्त्यातून दिसून आला आहे. रस्ता जेव्हा तयार होतो तेव्हाच या रस्त्याचा दर्जा कशा पद्धतीने आहे याची तपासणी करणे गरजेचे आहे. पण आर्थिक देवाणघेवाणीच्या नादात रस्ता हा खड्ड्यात जातो, ही निंदनीय बाब म्हणावी लागेल. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे प्रत्येक भाषणामध्ये चॅलेंज करून सांगतात की, ”मी या मतदारसंघांमध्ये लाखोंची कामे आणलेली आहे”. पण पालकमंत्री महोदय त्या कामांचा दर्जा तरी एखाद्या वेळेस तपासून बघा, आपण आणलेली कामं खरोखर दर्जेदार होत आहे की निकृष्ट, याची देखील एक वेळा तपासणी करा.या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओतील या नागरिकांनी संबंधित ठेकेदाराची चौकशी करून या ठेकेदाराकडून पूर्ण रक्कम वसूल करण्यात यावी. तसेच त्यावर कारवाई करण्याची मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून होत आहे. आता प्रशासन या व्हिडिओची दखल घेऊन कारवाई करणार की यातून पळवाट काढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *