आजपासून पृथ्वीला मिळणार ‘पिटुकला चंद्र’! किती दिवस सोबत असेल नवा चांदोमामा? जाणून घ्या

Khozmaster
2 Min Read
नवीन मिनी मून फक्त 10 मीटर आकाराचा आहे त्यामुळे पृथ्वीवरून दिसणार नाही. परंतु पुढील दोन महिने आपल्या सोबत असणार आहे हे विसरून चालणार नाही. या लघुग्रहाचा शोध नासाने 7 ऑगस्ट रोजी लावला जो अर्जुन लघुग्रह पट्ट्यातून आला आहे आणि पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यावर पुन्हा तिथेच जाणार आहे.आजपासून पृथ्वीच्या नैसर्गिक उपग्रह चंद्राला एक शेजारी लाभत आहे, पृथ्वीला दुसरा चंद्र मिळणार आहे. 29 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत 2024 PT5 नावाचा लघुग्रह ज्याला ‘मिनी मून’ म्हटलं जात आहे पृथ्वीभोवती परिभ्रमण करणार आहे. त्यानंतर हा लघुग्रह आपल्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रातून बाहेर जाईल.

नावाप्रमाणे या पिटुकल्या चंद्राचा आकार खूप छोटा म्हणजे फक्त 10 मीटर इतका आहे. त्यामुळे उघड्या डोळ्यांना हा लघुग्रह दिसणार नाही. अर्जुन लघुग्रह पट्ट्यातून आलेला या खगोलीय दगडाचा शोध नासाला 7 ऑगस्टला लागला. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यावर हा लघुग्रह पुन्हा आल्या मार्गी परत जाईल.नासाच्या नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजचे डायरेक्टर Paul Chodas यांनी म्हटलं आहे की 2024 PT5 लघुग्रह एकेकाळी चंद्रावर झालेल्या आघातातून निर्माण झाल्याची शक्यता आहे. म्हणजे मिनी मून एकेकाळी चंद्राचाच भाग असू शकतो.

Contents
नवीन मिनी मून फक्त 10 मीटर आकाराचा आहे त्यामुळे पृथ्वीवरून दिसणार नाही. परंतु पुढील दोन महिने आपल्या सोबत असणार आहे हे विसरून चालणार नाही. या लघुग्रहाचा शोध नासाने 7 ऑगस्ट रोजी लावला जो अर्जुन लघुग्रह पट्ट्यातून आला आहे आणि पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यावर पुन्हा तिथेच जाणार आहे.आजपासून पृथ्वीच्या नैसर्गिक उपग्रह चंद्राला एक शेजारी लाभत आहे, पृथ्वीला दुसरा चंद्र मिळणार आहे. 29 सप्टेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत 2024 PT5 नावाचा लघुग्रह ज्याला ‘मिनी मून’ म्हटलं जात आहे पृथ्वीभोवती परिभ्रमण करणार आहे. त्यानंतर हा लघुग्रह आपल्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रातून बाहेर जाईल. नावाप्रमाणे या पिटुकल्या चंद्राचा आकार खूप छोटा म्हणजे फक्त 10 मीटर इतका आहे. त्यामुळे उघड्या डोळ्यांना हा लघुग्रह दिसणार नाही. अर्जुन लघुग्रह पट्ट्यातून आलेला या खगोलीय दगडाचा शोध नासाला 7 ऑगस्टला लागला. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यावर हा लघुग्रह पुन्हा आल्या मार्गी परत जाईल.नासाच्या नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजचे डायरेक्टर Paul Chodas यांनी म्हटलं आहे की 2024 PT5 लघुग्रह एकेकाळी चंद्रावर झालेल्या आघातातून निर्माण झाल्याची शक्यता आहे. म्हणजे मिनी मून एकेकाळी चंद्राचाच भाग असू शकतो.पिटुकल्या चंद्राविषयीचे रंजक माहिती पृथ्वी वेळोवेळी असे लघुग्रह आकर्षित करते ज्यांना नियर अर्थ ऑब्जेक्ट (NEO) देखील म्हटले जाते. याआधी 2006 एक लघुग्रह जळपास वर्षभर तर एक लघुग्रह अनेक वर्ष पृथ्वीच्या कक्षेत होता आणि 2020 मध्ये तो अवकाशात निघून गेला.

पिटुकल्या चंद्राविषयीचे रंजक माहिती

  • आजपासून पृथ्वीला एक तात्पुरता दुसरा चंद्र मिळेल ज्याचे नाव 2024 PT5 आहे.
  • हा मिनी मून 29 सप्टेंबरपासून 25 नोव्हेंबर पर्यंत पृथ्वीभोवती परिभ्रमण करेल.
  • 2024 PT5 एक लघुग्रह आहे ज्याचा व्यास सुमारे 10 मीटर आहे.
  • याच्या छोट्या आकारामुळे हा पृथ्वीवरून दिसणे कठीण आहे.
  • या लघुग्रहांचा शोध नासाने 7 ऑगस्ट रोजी लावला होता.
  • 2024 PT5 अर्जुन लघुग्रह पट्ट्यातून आला आहे आणि पुन्हा तिथेच जाईल.
  • वेळोवेळी पृथ्वी असे लघुग्रह आकर्षित करत असते.
  • हे लघुग्रह शेजारी असलेल्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे देखील पृथ्वीकडे ढकललेले जाऊ शकतात.
  • NASA अश्या 28,000 नियर अर्थ ऑब्जेक्टवर नजर ठेऊन आहे.
  • 2024 PT5 ची निर्मिती चंद्रावर झालेल्या आघातातून झालेली असावी.
पृथ्वी वेळोवेळी असे लघुग्रह आकर्षित करते ज्यांना नियर अर्थ ऑब्जेक्ट (NEO) देखील म्हटले जाते. याआधी 2006 एक लघुग्रह जळपास वर्षभर तर एक लघुग्रह अनेक वर्ष पृथ्वीच्या कक्षेत होता आणि 2020 मध्ये तो अवकाशात निघून गेला.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *