Ray-Ban Meta स्मार्ट चष्म्याचा वापर हार्वर्ड विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या दोन विद्यार्थ्यांनी एक अॅप तयार करण्यासाठी केला. हे अॅप लोकांची खासगी माहिती न शोधता उघड करू शकेल. विद्यार्थ्यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर व्हिडिओचा डेमो पोस्ट केला आणि अॅपची क्षमता दाखवली आहे.
हार्वर्ड विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या दोन विद्यार्थ्यांनी हे अॅप युजर्ससाठी सार्वजनिकरित्या उपलब्ध करून दिले जात नाही, असं सांगितलं आहे. त्याऐवजी या विद्यार्थ्यांनी एआय-संचालित वियरेबल्सचे धोके अधोरेखित करण्यासाठी ते तयार केले आहे. हे कॅमेरा वापरणाऱ्या लोकांचे फोटो कॅप्चर करू शकतात.आय-एक्सरे नावाचे हे अॅप चेहऱ्याच्या ओळखीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरते आणि त्यानंतर प्रक्रिया केलेल्या व्हिज्युअल डेटाचा वापर करतो. डॉक्सिंग हा एक लोकप्रिय इंटरनेट स्लॅंग आहे हा “ड्रॉपिंग डॉक्ससाठी (माहिती किंवा दस्ताऐवज)” वापरला जातो. एखाद्याची वैयक्तिक माहिती त्यांच्या संमतीशिवाय उघड करण्याची ही कृती आहे.एआय मॉडेल मतदार नोंदणी डेटाबेससारख्या सार्वजनिकरित्या उपलब्ध सरकारी डेटा देखील स्क्रॅप करते. तसेच यासाठी फास्टपीपलसर्च नावाचे ऑनलाइन टूलही वापरण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी सांगितले आहे की, ते हे अॅप सार्वजनिकरित्या उपलब्ध करण्याचा विचार करीत नाहीत आणि त्यांनी केवळ एआय-सक्षम वियरेबल्सचे जोखीम अधोरेखित करण्यासाठी ते विकसित केले आहे. पण, कुणाचीही खासगी माहिती अशी सहज मिळत असल्यास त्याचा गैरवापर देखील होऊ शकतो.