बहिणीने iPhone मागवला, भावाने व्हिडिओ काढला, डिलिव्हरी बॉयला घाम फुटला

Khozmaster
2 Min Read
  • बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका महिलेने Flipkart Big Billion Days सेलदरम्यान iphone 15 ची ऑर्डर दिली होती. फोनचे पॅकेट उघडून ते तपासण्याची संधी मिळावी म्हणून महिलेने ओपन बॉक्स डिलिव्हरीचा पर्याय निवडला होता. पण डिलिव्हरी बॉय आल्यावर त्याने पॅकेट उघडण्यास नकार दिला आणि पॅकेट न उघडता डिलिव्हरी मार्क करायची होती.पुढे महिलेच्या भावाने संपूर्ण घटना व्हिडिओत रेकॉर्ड केली आणि जेव्हा महिलेने आणि तिच्या भावाने पॅकेट न उघडता फोन घेण्यास नकार दिला तेव्हा दुसरा डिलिव्हरी बॉय एक लहान पॅकेट घेऊन आला. जाणून घ्या मग नेमकं काय घडलं.रेडिटवरील एका पोस्टमध्ये ‘taau_47’ नावाच्या एका व्यक्तीने लिहिले आहे, ‘फ्लिपकार्ट स्कॅमर्स सावध राहा’ माझ्या बहिणीने फ्लिपकार्टवरून iphone 15 खरेदी केला आणि तिने ओपन बॉक्स डिलिव्हरीचा पर्याय निवडला.’

मला दुसरं पॅकेट द्यायचं होतं..’

“पण, डिलिव्हरी बॉयने बॉक्स खोलण्यास नकार दिली. त्याने काही अनोळखी लोकांना फोन केला. यावेळी ते म्हणाले की ‘असा कोणताही नियम नाही.’ तो खूप घाबरला होता कारण मी सर्व काही व्हिडिओवर रेकॉर्ड केले होते. त्याने आपल्या सहकाऱ्यांना कन्नड भाषेत सांगितले की, सर्व काही रेकॉर्ड केले आहे. पुढे पुन्हा दोन मिनिटांनी दुसरा मुलगा आला आणि त्याला एक छोटेसे पॅकेट द्यायचे होते. त्याने पॅकेट उघडतो असं सांगितलं. म्हणजे जर मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला नसता, तर कदाचित माझी फसवणूक झाली असती.’ असं ‘taau_47’ या नावाच्या व्यक्तीने रेडिटवर लिहिले आहे.ओपन बॉक्स डिलिव्हरी म्हणजे काय?

फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना पॅकेज घेण्यापूर्वी पॅकेज उघडण्याची आणि वस्तू तपासण्याची संधी देते. ही सुविधा मोजक्याच ठिकाणी उपलब्ध असून त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 27 सप्टेंबरपासून सुरू झाला असून तो 6 ऑक्टोबरला संपणार आहे.सण उत्सवाचे दिवस असल्यानं आता वेगवेगळे सेल येत आहेत. आपण वस्तू घेतो पण त्याचवेळी सावधगिरी बाळगतो का, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण, अलिकडे फसवणुकीच्या प्रकरणांचे अनेक किस्से रोज वृत्तपत्रात, वेबसाईटवर किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचायला मिळतात. बंगळुरुचं हे प्रकरण ताजे असताना आपण देखील सावधगिरी बाळगायला हवी. कारण, खात्री करून कोणताही व्यवहार न केल्यास आपली देखील फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *