जळगाव : आरक्षण कायमचे संपले पाहिजे, या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना व भाजप हे चारही पक्ष एक असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी जळगाव जिल्ह्यात पत्रकार परिषदेत बोलताना केला. वंचित बहुजन आघाडी आरक्षण टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.चोपडा येथे होणाऱ्या आदिवासी सत्तापरिवर्तन परिषदेसाठी प्रकाश आंबेडकर जळगाव जिल्ह्यात आले आहेत. या वेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणासह आगामी विधानसभा निवडणुकीवर आपली भूमिका मांडली. आंबेडकर म्हणाले, की देशातील आरक्षणव्यवस्था संकटात आहे. देशात आघाड्यांचे राजकारण चालतच राहील, पण आरक्षण कायमचे संपले पाहिजे या मुद्द्यावर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचा ठाकरे गट या चारही पक्षांचे एकमत झाले आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी या विरोधात लढा देण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत सामाजिक दृष्टिकोनातून मतांचे ध्रुवीकरण होईल. त्यात आरक्षणाचा लाभ घेणारे एकीकडे व ज्यांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आरक्षण संपवण्याची भूमिका आहे ते दुसऱ्या बाजूला राहतील, असा दावादेखील आंबेडकर यांनी केला.
शरद पवारांवर टीका
शरद पवार यांनी आपल्या रत्नागिरीच्या सभेत मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा दिला. याविषयी त्यांनी त्यांच्या पक्षाची म्हणजे राष्ट्रवादीची भूमिका मांडली. मात्र, ओबीसींचे आरक्षण हे ओबीसींचेच असले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर त्यांनी ते वेगळे द्यावे. त्यांचा ओबीसीत समावेश करू नये, अशा शब्दांत त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे.
ओबीसीतून आरक्षणाला विरोध
आंबेडकर म्हणाले, की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या मागणीवर राजकीय पक्षांनी अद्याप स्पष्ट भूमिका घेतली आहे. मात्र, ओबीसी समाजाने मराठ्यांना आपल्या कोट्यातून आरक्षण देण्यास ठाम विरोध दर्शवला आहे. ओबीसींच्या या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
ओबीसीतून आरक्षणाला विरोध
आंबेडकर म्हणाले, की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या मागणीवर राजकीय पक्षांनी अद्याप स्पष्ट भूमिका घेतली आहे. मात्र, ओबीसी समाजाने मराठ्यांना आपल्या कोट्यातून आरक्षण देण्यास ठाम विरोध दर्शवला आहे. ओबीसींच्या या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.चोपडा येथे होणाऱ्या आदिवासी सत्तापरिवर्तन परिषदेसाठी प्रकाश आंबेडकर जळगाव जिल्ह्यात आले आहेत. या वेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणासह आगामी विधानसभा निवडणुकीवर आपली भूमिका मांडली. आंबेडकर म्हणाले, की देशातील आरक्षणव्यवस्था संकटात आहे. देशात आघाड्यांचे राजकारण चालतच राहील, पण आरक्षण कायमचे संपले पाहिजे या मुद्द्यावर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचा ठाकरे गट या चारही पक्षांचे एकमत झाले आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी या विरोधात लढा देण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत सामाजिक दृष्टिकोनातून मतांचे ध्रुवीकरण होईल. त्यात आरक्षणाचा लाभ घेणारे एकीकडे व ज्यांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आरक्षण संपवण्याची भूमिका आहे ते दुसऱ्या बाजूला राहतील, असा दावादेखील आंबेडकर यांनी केला.