मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्या पायाला गोळी लागल्याची घटना समोर आली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी सकाळी ४.४५ वाजता अभिनेत्याला त्यांच्याच रिव्हॉल्व्हरमधून गोळी लागली. अभिनेता इतक्या सकाळी लायसन्स रिव्हॉल्व्हर घेऊन कुठे जात होते? याबाबत आता अभिनेत्याच्या मॅनेजरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
गोविंदा यांच्या मॅनेजरने दिली माहिती
गोविंदा यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदा कोलकत्त्याला निघाले होते. कोलकत्त्याला जाण्याआधी गोविंदा आपलं रिव्हॉल्व्हर त्यांच्या कपाटात ठेवत होते. त्यावेळी अचानक त्यांच्या हातातून रिव्हॉल्व्हर सुटलं आणि त्यातून निघालेली गोळी थेट त्यांच्या पायाला लागली.आता डॉक्टरांनी अभिनेत्याच्या पायात घुसलेली गोळी काढली असून त्यांची तब्येत आता बरी असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या ते क्रिटीकेअर रुग्णायलात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
जुहू येथील घरातून विमानतळावर जाण्यासाठी निघाले असताना घडली घटना
गोविंदा बुधवारी सकाळी जुहू येथील त्यांच्या घरुन विमानतळावर निघत होते. त्यावेळी रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवताना त्यांच्याच हातातून रिव्हॉल्व्हरमधून निघालेली पायाला लागली. ही घटना ज्यावेळी घडली, त्यावेळी गोविंदा एकटेच घरात होते. ते बाहेर निघण्याची तयारी करत असताना लायसन्स रिव्हॉल्व्हर साफ करत होते. त्याचवेळी ते कपाटात ठेवताना अचानक त्यांच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटली आणि ते जखमी झाले. त्यानंतर तात्काळ गोविंदा यांनी त्यांच्या जवळच राहणाऱ्या नातेवाईकांना कॉल केला आणि त्यांनी गोविंदा यांना रुग्णालयात दाखल केलं. आता त्यांच्या पायातील गोळी काढण्यात आली असून त्यांचा धोका टळला आहे.
गोविंदा यांचं रिव्हॉल्व्हर पोलिसांनी घेतलं ताब्यात
या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदा यांचं रिव्हॉल्व्हर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. या घटनेनंतर गोविंदा यांच्या कुटुंबाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र या घटनेनंतर गोविंदा यांच्या अनेक चाहत्याकडून चिंता व्यक्त केली जात आहे.